उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या विमानात ३५५ प्रवासी प्रवास करत होते. उजव्या बाजूचं इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने तातडीने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवलं.


एअर इंडियाचं AI887 हे विमान आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर शून्यावर आल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी हवेतच यू-टर्न घेतला आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलं.


ऑईल प्रेशर कमी होणं ही विमानासाठी गंभीर तांत्रिक अडचण मानली जाते. या स्थितीत इंजिनच्या काही भागांपर्यंत तेल पोहोचत नाही, ज्यामुळे इंजिन गरम होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उड्डाण सुरू ठेवल्यास इंजिन पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विमानातील दुसरं इंजिन कार्यरत असल्यास वैमानिक सुरक्षित लँडिंग करू शकतात, म्हणूनच तत्काळ लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.


दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो