मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर, या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली होती.
या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, भाजपाने सर्वाधिक १२९ नगराध्यक्ष पदे मिळवत नवा विक्रम नोंदवला आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक कार्यक्रम सुरू असल्याने, त्या भागात आचारसंहिता १६ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. या भागात १५ जानेवारी रोजी मतदान होईल, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.