भारतीय जनता पार्टी ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जव्हारचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि नागरी सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस विकासकामे हाती घेतली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येईल.
भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार
जव्हार नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १ – नकुल पटेकर, प्रभाग क्र. २ – हितेश जाधव, पूजा खोरगडे, प्रभाग क्र. ३ – आफरीन शेख, प्रभाग क्र. ४ – कुणाल उदावंत, प्रभाग क्र. ६ – स्वप्निल औसरकर, स्नेहा घाटाळ, प्रभाग क्र. ७ – अनंता गरेल, प्रभाग क्र. ८ – सचिन सटणेकर, मनीषा वड, प्रभाग क्र. ९ – संगीता मुकणे, सुशील सहाने, प्रभाग क्र. १० – दर्शन तामोरे, रुचिता वाजे या निकालात भाजपच्या पूजा उदावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
तसेच इतर पक्षांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. १ – पद्मा रजपूत (शिवसेना), प्रभाग क्र. ३ – अमोल बर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४ – अश्विनी चव्हाण (मविआ), प्रभाग क्र. ५ – कमल कुवरे, इमरान मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ७ – नसीमा मेमन (शिवसेना गट)