नगराध्यक्षा प्रीतम पाटील ५ हजार ८६० मतं
पेण : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील या ५ हजार ८६० मतांनी निवडून आल्या. यामध्ये भाजपचे १२, राष्ट्रीय अजित पवार गट ५, नगरविकास आघाडी ३, आम्ही पेणकर विकास आघाडी २, शिवसेना शिंदे गट १ तर उबाठाचा १ उमेदवार विजयी झाला. त्यामुळे पेण नगरपालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.
पेण नगरपालिकेत १२ प्रभागांमध्ये २४ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण २५ सदस्य निवडून आले असून या निवडणुकीत सहा नगरसेवक आगोदरच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आज १८ नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या भाजपच्या प्रीतम पाटील यांना एकूण १४ हजार २७३ एकूण मत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या आम्ही पेणकर विकास आघाडीच्या रिया धारकर यांना ८ हजार ४१२ मत आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना ६८७ मत मिळाली असल्याने प्रितम पाटील या ५ हजार ८६० मतांनी निवडून आल्या असल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी हॅट्रिक साधली आहे. तर प्रभाग १ (अ) मध्ये भाजप उमेदवार कलावती पाटील, (ब) नगरविकास आघाडी संतोष श्रृंगारपुरे, २ (अ) भाजप पल्लवी कालेकर, (ब) आम्ही पेणकर विकास आघाडी प्रवीण पाटील, ३ (अ) नगर विकास आघाडी सुजाता डाकी, (ब) संजय म्हात्रे, ४ (अ) उबाठा गट अरुणा पाटील , (ब) शिवसेना शिंदे गट भूषण कडू, ५ (अ) भाजप अंजली जोगळेकर, ६ (अ ) संगीता लाड, (ब) आनंद जाधव, ७ (अ) आफ्रीन अखवारे, (ब) आम्ही पेणकर विकास आघाडी कृष्णा भोईर, ८ (अ ) भाजप जास्विन पाटील, (ब ) अनिरुद्ध र पाटील, ९ (अ ) राष्ट्रवादी काँग्रेस निवृत्ती पाटील, १० (अ) भाजप सुनीता जोशी, (ब) नीळकंठ म्हात्रे असे एकूण १८ नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षा असे निवडून आले. या अगोदरच बिनविरोध झालेले उमेदवार प्रभाग ५ (ब) राष्ट्रवादी काँग्रेस दीपक गुरव, ९ ( अ) वसुधा पाटील, ११ (अ ) भाजप मालती म्हात्रे, (ब) स्मिता माळी, १२ (अ) राष्ट्रवादी काँग्रेस सुशीला ठाकूर, (ब ) भाजप अभिराज कडू असे मिळून एकूण भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ५, नगरविकास आघाडी ३,आम्ही पेणकर विकास आघाडी २, शिवसेना शिंदे गट १ आणि शिवसेना ठाकरे गट १ उमेदवार विजयी झाल्याने त्यामुळेच पुन्हा पेण नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता स्थापन होत आहे. तर यावेळी निकाल जाहीर होताच आमदार रवी पाटील यांच्यासह नगराध्यक्षा प्रीतम पाटील तसेच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची संपूर्ण पेण शहरातून गुलाल, भंडारा उधळत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला होता.