उरणमध्ये भावना घाणेकर यांचा विजय

उरण : 'उरण नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावना घाणेकरांचा विजय कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा आहे. ज्या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, भावना घाणेकर टक्कर देणाऱ्या आणि जिंकणाऱ्या उमेदवार आहेत. त्या राजकारणात सक्रिय आहेत, त्या लढाऊ आहेत. त्यामुळे भावना घाणेकरच उमेदवार हव्यात, या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो. आज तो निर्णय भावना घाणेकरांच्या विजयाने सार्थ ठरला, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे महेंद्र घरत म्हणाले. त्यामुळे भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय 'ए तो झाकी, बहोत कुछ बाकी है'. जे म्हणत होते, भावना घाणेकर यांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यांना भावना घाणेकरांच्या दणदणीत विजयाने 'एकही मारा लेकीन सॉलिड मारा', अशी अवस्था करून ठेवली आहे.


उरणमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप मेहनत घेतली. अनेक नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे उरणमध्ये यश मिळाले, या निवडणुकीत मी चाणक्य नीतीचा वापर केला, असे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले.


विजयाच्या आनंदाने महेंद्र घरत यांचा चेहरा फुलला होता. यावेळी त्यांनी बाळ्या मामा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महेंद्र घरत म्हणाले, "उरणबाबत आपण घेतलेली रोखठोक भूमिका मतदारांना आवडली. आपण मतदानाच्या दिवशी स्वतः येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलेत, ठामपणे मागे राहिलात याचा निश्चितच फायदा उरण नगरपालिका निवडणुकीत झाल्याचे सांगताना . त्यांनी त्याबद्दल अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या