अमेरिका पुढील ३ वर्षात ३.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय मॉल्समध्ये करणार

ॲनारॉकने दिलेल्या अहवालात स्पष्ट


प्रतिनिधी: जगभरात मागणी विक्रीत संतुलनात नवी मर्यादा आल्याचे आपण यापूर्वी पाहिले होते. याच रिटेल विक्रीतील संकटाचा सामना पाश्चात्य देशातील मॉल्सला होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विख्यात रिअल इस्टेट कंपनी ॲनारॉकने (Anarrock) आपल्या नव्या अहवालात स्पष्ट केले आहे.


अहवालातील माहितीनुसार, पाश्चात्य देशांमधील मॉल्स अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत असताना, जागतिक भांडवल एका अशा बाजाराकडे वळत आहे जो प्रत्येक जागतिक किरकोळ विक्रीच्या ट्रेंडला आव्हान देत असल्याचे दिसते तो म्हणजे भारत आहे असे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी अनारॉकने म्हटले आहे.


आर्थिक वर्ष २०२० पासून अमेरिकेत जवळपास १२०० मॉलमधील दुकाने बंद झाली आहेत, आणि वाढत्या रिक्त जागांमुळे जवळपास ४०% रिकाम्या मॉल्सना झोनिंग अथवा इतर वापरासाठी करावा लागत आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतात मात्र वाढती मजबूत ग्राहक मागणी आणि वाढत्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर किरकोळ विक्री क्षेत्रात पुनरुज्जीवन होत आहे, असे अनारॉकने या आठवड्यात सांगितले.


अनारॉक ग्रुपचे रिटेल लीजिंग आणि इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्सचे सीईओ अनुज केजरीवाल यांच्या मते पुढील ३ वर्षांत भारतीय मॉल्समध्ये ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यातील निरिक्षणानुसार ८८ हून अधिक परदेशी ब्रँड्सनी भारतीय किरकोळ बाजारात प्रवेश केला आहे आणि ते आक्रमकपणे विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखी अनेक जागतिक ब्रँड्स प्रतीक्षेत आहेत आणि सध्या उपलब्ध असलेल्या अत्यंत मर्यादित 'ग्रेड-ए' मालमत्तांमध्ये जागा शोधत आहेत' असेही अनुज केजरीवाल यांनी पुढे आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.


तसेच अहवालातील आणखी माहितीनुसार, पाश्चात्य देशांच्या बाजारांच्या अगदी उलट, भारतातील तरुण ग्राहक वर्गाची प्रचंड अद्याप पूर्ण न झालेली मागणी आणि संघटित किरकोळ विक्री मर्यादित स्पर्धा, व्यवसायासाठी थेट परकीय गुंतवणूक धोरणांचा सरकारी पाठिंबा या गोष्टीच परदेशी ब्रँड्स आणि गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित केले जात आहे.जागतिक गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक बाबींपैकी एक म्हणजे भारतीय मॉल्सनी ई-कॉमर्ससमोर अद्याप हार मानलेली नाही. उलट त्यांना त्याचा फायदाच होत आहे असे ॲनारॉकने म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेत दिसणाऱ्या २०% पेक्षा अधिक पातळीच्या तुलनेत, भारतातील ई-कॉमर्सचा प्रसार सुमारे ८% आहे, असेही त्यात नमूद केले आहे.


अनारॉकच्या मते, देशात दर्जेदार किरकोळ विक्रीच्या जागेचा अत्यंत तुटवडा हे आत्मविश्वासाचे एक प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारतातील दरडोई किरकोळ विक्रीची जागा जगातील सर्वात कमी आहे. ही तफावत आणि गेल्या दशकात भारतातील दरडोई उत्पन्न जवळपास दुप्पट झाल्यामुळे जागतिक किरकोळ विक्री क्षेत्रात क्वचितच दिसून येणारी मागणी-पुरवठ्यातील मोठी तफावत निर्माण झाली आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.


आपल्या अहवालात स्पष्ट करताना,'ग्रेड-ए मॉल्स जवळपास पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, महत्त्वाच्या जागांसाठी लांब प्रतीक्षा यादीसह ९५-१००% जागा भरल्याचे दिसून येत आहे.भाड्याची वाढ सातत्याने महामारीपूर्व पातळीपेक्षा जास्त झाली आहे आणि आता विकासकांना असे दिसून येत आहे की भाडेपट्टीची वाढ बांधकाम सायकलपेक्षाही वेगाने पुढे जात आहेत.जगामध्ये कुठेही एक दुर्मिळ गोष्ट आहे असे अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यातील निरिक्षणानुसार, लोकसंख्याशास्त्रीय मागणीच्या घटकांच्या या दुर्मिळ संयोजनामुळे अथवा व्यवस्थापनेमुळे भारताची ग्राहक उपभोग (Consumer Consumption) नवीन मागणी तयार करत आहे.पुढे अनारॉकने म्हटले आहे की, २०३० पर्यंत देश ६ ट्रिलियन डॉलर्सची उपभोग अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.


पाश्चात्य देशांमधील मॉल्सच्या विपरीत भारतीय मॉल्स मात्र मनोरंजन, भोजन आणि सामाजिक अनुभवांवर आधारित जीवनशैलीची ठिकाणे आहेत. प्रमुख मॉल्समधील दैनंदिन पादचारी गर्दी आठवड्याच्या दिवसांमध्ये नियमितपणे २०००० पेक्षा जास्त असते आणि आठवड्याच्या शेवटी ४०००० पेक्षा जास्त होते. खाद्य आणि पेय (फूड अँड बेव्हरेज) आणि मनोरंजन क्षेत्राचा आता एकूण गर्दीमध्ये ३०-३५ % वाटा वाढला आहे.

Comments
Add Comment

रिअल इस्टेट संस्थात्मक गुंतवणूकीत १०.४ अब्ज डॉलरवर 'रेकोर्डब्रेक' वाढ

मुंबई: भारतात मोठ्या प्रमाणात पाश्चात्य देशातील गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचाच पाठपुरावा म्हणून

Gujarat Kidney and Super Speciality Hospital IPO Day 1: पहिल्याच दिवशी गुजरात किडनी व सुपर स्पेशालिटी आयपीओ 'खल्लास' १.३१ पटीने सबस्क्रिप्शन पूर्ण

मोहित सोमण: पहिल्या दिवशीच गुजरात किडनी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'ख्रिसमसची' तयारी जोरात,आयटी, मिडकॅप, मेटल शेअरची कमाल! सेन्सेक्स ६३८.१२ निफ्टी २०६.०० अंकाने उसळला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात आणखी झाल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी वाढ नोंदवली आहे.

हिंगोली जिल्ह्यात महायुतीचा डंका, तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष

हिंगोली : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप सर्वात मोठा

Maharashtras 288 Municipal Election Result 2025 : राज्यातील २८८ नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सविस्तर

मुंबई: राज्यात २८८ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. भाजपने कोकण