जनतेचा निकाल मान्य, आता विकासावर लक्ष! निकालानंतर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

कणकवली: नगरपरिषद आणि नगरपालिकेचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. कोणते उमेदवार, किती मतांनी विजयी झाले किंवा पराजित झाले याचे अधिकृत आकडे स्पष्ट होत असताना गुलाला उधळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात भाजपचे कमळ फुलवल्याल्यानंतर भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी पहिली प्रतिक्रिया आली आहे.


नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यातील नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वेंगुर्ल्यातून दिलीप उर्फ राजन गिरप तर सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे मालवणमध्ये ममता वराडकर आणि कणकवलीमधून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर निवडून आले आहेत.


जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चारही उमेदवाऱ्यांच्या मागण्या आणि अपेक्षा नियोजन स्वरुपात माझ्याकडे आल्यास कोणताही पक्षपात न करता शंभर टक्के न्याय देण्याचा शब्द नितेश राणेंनी दिला आहे. तसेच निवडणुका कोणत्याही परिस्थितीत झाल्या असल्या तरी विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या वतीने जी मदत लागेल ती उभी करणे ही माझी जबाबदारी असेल असे राणेंनी स्पष्ट केले आहे.


कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा
नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आल्यामुळे राणेंनी सर्व श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि कोणतीही कसर न ठेवता निवडणूक काळात जे काम केले त्यासाठी नितेश राणेंनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


जनतेचा निकाल मान्य
लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या मताचा आदर ठेवावा लागतो. त्यामुळे जनतेने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो आणि या दृष्टीतून मालवण आणि कणकवलीमध्ये पक्ष बांधणीमध्ये काय काय करता येईल आणि कसे सक्षम होता येईल यासाठी संघटनात्मक पद्धतीने पावले उचलू असे राणेंनी सांगितले. तसेच २०१७ ला कणकवलीच्या जनतेने सेवेची संधी दिली होती. आमच्या कामाबाबत त्यांना काही गोष्टी पटल्या नसतील, त्यामुळे जनतेने मतदानाच्या स्वरुपात त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत ते आम्हाला मान्य असल्याचे मोठ्या मनाने स्वीकारल्याचे राणेंच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.





निलेश राणेंचे अभिनंदन
मालवण आणि कणकवलीचे प्रभारी म्हणून निलेश राणेंकडे जबाबदारी होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जो विजय मिळाला त्यात निलेश राणेंच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे सांगत नितेश राणे यांनी मोठ्या भावाचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांबाबत ज्या रणनीती आखल्या त्याबाबत कौतूक सुद्धा केले.


नेमकं माझं कोण? राणेंचा प्रश्न
नगरपरिषदा, लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या विचारांनी लढल्या जातात. कणकवलीच्या निवडणुकीत सर्व एकत्र होते. ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढली गेली, त्यामध्ये कुटुंबापासून ते विरोधकांपर्यंत सर्वच विरोधात लढत असल्याने नेमकं माझं कोण हा प्रश्न पडल्याचे नितेश राणेंनी सांगितले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




Comments
Add Comment

मोहोळ नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा विजय; नगराध्यक्षपदी सर्वात कमी वयाचा उमेदवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने मोठा विजय मिळवला आहे. या

LIVE UPDATES : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालात महायुतीचाच वरचष्मा

महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर

Andheri Marol Gas Leak.. अंधेरीतील रमाबाई नगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट, लाईट सुरू करताच ठिणगी पेटली

अंधेरी : मुंबईतील अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील रमाबाई नगर परिसरात पहाटे गॅस लीकमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना

'ठाकरे गटाकडे व्हिजनच नव्हतं, म्हणून त्यांचा सुपडा साफ'; विजयानंतर निलेश राणेंचा घणाघात

सिंधुदुर्ग : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकांची यादी समोर, जाणून घ्या सविस्तर

प्रभागानुसार उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १ जागा क्रमांक अ (सर्वसाधारण स्त्री): खेडेकर वैभवी विजय (शिवसेना) =

वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ल्याच दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी; भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना सावंतवाडीत भाजपच्या