नव्या वर्षातही विरोधी पक्ष नेतेपदाची वाट खडतर

२०२६ मध्ये महाविकास आघाडीचे ७ आमदार निवृत्त होणार


मुंबई : विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ सातत्याने घटत असल्याने विरोधी पक्ष नेतेपदाची वाट दिवसागणिक खडतर बनत चालली आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता नव्या वर्षात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह सात आमदार निवृत्त होणार आहेत. परिणामी वरिष्ठ सभागृहातदेखील सरकारला प्रभावी आव्हान देणे मविआसाठी कठीण होणार आहे.


पुढील मे आणि डिसेंबर महिन्यात अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने २०२६ हे वर्ष मविआसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उबाठा पक्षप्रमुखांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेसच्या राजेश राठोड यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येईल, तर शरद पवार गटाचे अरुण लाड ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.


याशिवाय नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर आणि अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार आहे. परिणामी, विरोधी पक्षातील सुमारे सात आमदार कमी होणार असून, मविआकडे केवळ ८ आमदार शिल्लक राहतील. त्यामुळे आपसूकच विरोधी पक्ष नेतेपदावरील सर्वांचाच दावा संपुष्टात येईल. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमधील काही सदस्यांचा कार्यकाळही पुढील वर्षी संपत आहे.


विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपेल, तर सतीश चव्हाण ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.


मात्र, महायुतीचे विधानसभेतील प्रचंड बहुमत लक्षात घेता, त्यांना विधान परिषदेची निवडणूक सोपी जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Comments
Add Comment

'ठाकरे गटाकडे व्हिजनच नव्हतं, म्हणून त्यांचा सुपडा साफ'; विजयानंतर निलेश राणेंचा घणाघात

सिंधुदुर्ग : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकांची यादी समोर, जाणून घ्या सविस्तर

प्रभागानुसार उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १ जागा क्रमांक अ (सर्वसाधारण स्त्री): खेडेकर वैभवी विजय (शिवसेना) =

वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ल्याच दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी; भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना सावंतवाडीत भाजपच्या

नगराध्यक्षापदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी; आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेचा जल्लोष

हा जनतेचा विजय: आ. निलेश राणे मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष