आता डॉक्टरांना ‘सुवाच्य अक्षरात’ लिहावी लागणार औषधांची नावे

एनएमसीचे वैद्यकीय महाविद्यालयांना कडक आदेश


मुंबई : डॉक्टरांचे औषधाच्या चिठ्ठीमधील अक्षर सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असते. रुग्ण, नातेवाईक व फार्मासिस्ट यांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे औषधाच्या चिठ्ठीतील डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर देखरेख ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. औषधाच्या चिठ्ठीसंदर्भातील नियम, नियामक व नैतिक मानकांचे पालन आणि निरीक्षण करण्यासाठी देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना औषध व उपचार समिती (ड्रग्स अँड थेरप्युटिक्स कमिटी – डीटीसी) अंतर्गत स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २७ ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांच्या अभ्यासक्रमात औषधचिठ्ठी सुवाच्य आणि स्पष्ट हस्ताक्षरात असण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच औषधचिठ्ठी व वैद्यकीय दस्ताऐवजांची वाचनीयता हे भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत आरोग्य हक्काचा एक आवश्यक घटक असल्याचे स्पष्ट केले आहे.


राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, २०१९, भारतीय वैद्यकीय परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नीतिमत्ता) नियम, २००२ आणि २१ सप्टेंबर २०१६ च्या अधिसूचनेतील तरतुदींचा संदर्भ दिला आहे. यामध्ये प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने औषधाची चिठ्ठी वाचनीय आणि शक्यतो मोठ्या अक्षरात लिहणे बंधनकारक आहे. वैद्यकीय कागदपत्रांमध्ये सुवाच्य आणि स्पष्टतेची आवश्यकता यावर भर देऊन वैद्यकीय आस्थापना (नोंदणी आणि नियमन) कायदा, २०१० आणि इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींवरील संबंधित नियमांचा संदर्भ न्यायालयाने दिला आहे.


न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार एनएमसीने सध्या देशात लागू असलेल्या नियमांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाच्या चिठ्ठीच्या पद्धतींची अधिक सखोलपणे निरीक्षण करण्याची आवश्यकता नमूद केली. त्यानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने डीटीसीअंतर्गत उपसमिती स्थापन करून औषधाच्या चिठ्ठीचे प्रणालीबद्ध मूल्यमापन करणे, पद्धतींचा आढावा व विश्लेषण करणे आणि आवश्यक सुधारात्मक उपाय सुचवणे, या मूल्यमापनांचे निष्कर्ष डीटीसीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नोंदविणे एनएमसीने बंधनकारक केले आहे.


एनएमसीने या इतिवृत्तांताची मागणी केल्यास त्यांना या नोंदी उपलब्ध करणे बंधनकार असणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना उप-समिती तत्काळ स्थापन करण्याचे आणि देखरेख यंत्रणा विलंब न करता कार्यान्वित करण्याचे निर्देशही एनएमसीने दिले आहेत.


कशी असावी औषधाची चिठ्ठी


प्रत्येक डॉक्टरने औषधाची चिठ्ठी स्पष्टपणे आणि शक्यतो मोठ्या अक्षरात लिहून द्यावी. औषधांची जेनेरिक नावेही लिहून द्यावीत. तसेच औषधांचा तर्कसंगत वापर यावर औषधाच्या चिठ्ठीमध्ये भर द्यावा. अशा सूचनाही आयोगाने केल्या आहेत.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई