Dhurandhar And Marathi Movie Uttar.. 'धुरंधर'च्या वादळातही 'उत्तर' ची हवं हवा ; यापुढे मराठी चित्रपट मार खाणार नाही, दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

मुंबई : अक्षय खन्ना, रणवीर सिंग धुरंधर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, चोहीकडे धुरंधरची चर्चा होताना दिसतेय. अश्यातच हॉलिवूड चा बहुचर्चित अवतार रिलीज झाला आणि थेट बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवलेल्या धुरंधरला झटका दिला. पण त्यातच १२ डिसेंबर ला रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांचा उत्तर हा मराठी चित्रपट रिलीज करण्यात आला. याचसोबतच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की मराठी सिनेमा धुरंधर च्या शर्यतीत टिकेल का? पण हा चित्रपट धुरंधर समोर अगदी पुरून उरलाय. धुरंधरच्या वादळातही 'उत्तर' ला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.


या सिनेमात मुख्य भूमिका रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांनी साकारल्या आहेत तर क्षितिज पटवर्धन यांनी या दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातल्या अभिनय बेर्डे च्या अभिनयाचं तर प्रचंड कौतुक केलं जात आहे, कित्येक दिवसांपाऊसन बॉक्स ऑफिस वर ठाण मांडून बसलेला धुरंधर समोर उत्तर अगदी ताठ मानेन उभा राहिला आहे. मराठी सिनेमाला कमी शो मिळनूही उत्तर दमदार कामगिरी करत आहे. एकीकडे उत्तर च्या यशाची चर्चा सुरु असतांनाच आता सिनेमाबाबत दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने एक खास पोस्ट केली आहे. ज्यामुळे त्याच कौतुक होत आहे.



पोस्ट मध्ये काय म्हणाला क्षितिज पटवर्धन


 रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे यांच्या 'उत्तर' सिनेमाचा दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाला की, "यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा 'उत्तर' प्रदर्शित झाला. 'धुरंधर'ने रणवीरच्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं की, व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं..."


"१२ ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की, सिनेमा १९ ला रिलीज होतोय, असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेजलासुद्धा शहरी सेंटर्समध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हलला सिलेक्शन झालं. बुक माय शोवर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्याकल्पनांची दखल घेतायत. आज दुसरा विकेंड आहे आणि 6 ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतारचे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशावेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून 'उत्तर'चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं की, या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं की, कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!", असं दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन म्हणालाय.

Comments
Add Comment

नृत्यांगना नोराचा अपघात! तरीही सनबर्नमध्ये केले नृत्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचा काल (२० डिसेंबर) मुंबईत अपघात झाला. नोरा डेव्हिड गुएटा

बॉलीवूडचा जलवा हॉलिवूडमध्ये, धुरंधर गाण्यावर थिरकले जोनस ब्रदर्स

मुंबई : सध्या सर्वत्र धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी कमाई, रणवीर सिंग

मल्लिका शेरावतची व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला हजेरी, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडमधील ‘मर्डर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’

निर्मिती सावंत - प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs