शाळांच्या नावातील ग्लोबल, इंटरनॅशनल शब्दांना बंदी

शिक्षण संचालनालयाचे निर्देश


मुंबई : राज्य मंडळाच्या अखत्यारितील शाळा प्रशासन शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’अशा शब्दांचा वापर करून पालकांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे पालक – विद्यार्थ्यांची दिशाभूल व फसवणूक रोखण्यासाठी शिक्षण संचालनालयाने हे शब्द शाळांच्या नावांमधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नावात असे शब्द असलेल्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देशही संचालनालयाने दिले आहेत.


राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या अनेक शाळा आपल्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई किंवा इंग्लिश मीडियम अशा शब्दांचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. या शब्दांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा पालकांचा समज होतो. याचा प्रतिकूल परिणाम पालक व विद्यार्थी यांच्यावर होण्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई’ हे नाव केंद्र शासनाने स्थापन केलेल्या परीक्षा मंडळाचे आहे. त्यामुळे हा शब्द वापरणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही.


राज्य मंडळाच्या शाळांनी तो नावात वापरणे अनुचित नसल्याचेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले. तसेच, ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ असे शब्द वापरण्यासाठी संबंधित शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांकडे अशी कोणतीही संलग्नता नसतानाही हे शब्द वापरले जात असल्याचे आढळले. त्यामुळे नव्याने मान्यता मागणाऱ्या, तसेच दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले.


पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल होईल अशी नावे असल्यास ती तात्काळ बदलण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्येही असे शब्द आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचेही संकेत संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.


यापुढे शाळा मान्यतेसाठी नव्याने येणाऱ्या प्रकरणांची तपासणी करताना शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या अन्य शाळा इत्यादींचा सर्वंकष विचार करावा. पालक व विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी शाळांची नावे असल्यास ती बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळवावे, त्यानंतर अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करावी. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये अशा प्रकारचे शब्द आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिले आहेत.


राज्यातील ११ शाळांना नावाबाबत फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना


१) ब्राईट प्युचर इंटरनॅशनल स्कूल, मिरज, जिल्हा सांगली.


२) पोदार इंटरनॅशनल स्कूल, मिरज, जिल्हा सांगली.


३) युरोप्रो इंटरनॅशनल स्कूल, कूर, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर


४) गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल, मौजे उंबर्डे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे.


५) पोदार इंटरनॅशनल स्कूल, टिटवाळा, तालुका कल्याण डोंबिवली, जिल्हा ठाणे.


६) स्नेहलता देव इंटरनॅशनल स्कूल, कौसा, जिल्हा ठाणे.


७) एस. व्ही. एस. इंटरनॅशनल स्कूल, टेंभूर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर.


८) भारत ग्लोबल स्कूल, वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे.


९) सी. एम. इंटनॅशनल स्कूल, विद्यानगर टिंगरेनगर, धानोरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.


१०) सत्यस्पर्श इंटरनॅशनल स्कूल, उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर.


११) सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल, सुदूंबरे, तातुका मावळ, जिल्हा पुणे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Health Tips : शरीराला एका दिवसात किती तेलाची गरज असते? जाणून घ्या योग्य प्रमाण, अन्यथा होतील भयंकर आजार

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना