फुकट पाणीपुरी न दिल्याने दुकानदारावर चाकू हल्ला

बेंगळुरू : पाणीपुरी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. या पाणीपुरीसाठी एक दुकानदाराचा जीव गेला आहे. फुकटात पाणी पुरी न दिल्याने पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या मालकावर थेट चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत दुकानदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सदर घटना ही कर्नाटकातील बंगळुरूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १० ते १०.३० च्या सुमारास बेंगळुरूतील बटरायनपुरा मुख्य रस्त्यावर एक पाणी पुरीवाला आपला ठेला घेऊन उभा होता. यादरम्यान त्याच्या ठेल्याजवळ एक दारूच्या नशेत तरुण आला. त्याने पाणी पुरीवाल्याकडे फुकटात पाणीपुरी मागितली. मात्र दुकानदाराने त्याला फुकटात देण्यास मनाई केली. दुकानदाराने विकतची पाणी पुरी खायला सांगितल्याने तरुण संतापला. या गोष्टीवर आरोपी भडकला आणि दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. वादाच्या दरम्यान आरोपीने अचानक चाकू काढला आणि दुकानदाराच्या पोटात चाकूने वार केला. चाकू लागताच दुकानदार तिथेच रक्तबंबाळ होऊन कोसळला, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी ताबडतोब जखमी दुकानदाराला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी दुकानदाराला मृत घोषित केले.

Comments
Add Comment

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

Gen Z Lingo म्हणजे काय? 'Slay', 'Queen', 'Yapping' ते Skull Emoji पर्यंत जाणून घ्या नवे अर्थ

Gen Z Lingo : सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या Gen Z पिढीची भाषा अनेकांसाठी अजूनही गोंधळात टाकणारी ठरते. विशेषतः 1997 ते 2012

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

Friendship Day 2026 Special : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारे बॉलीवूडचे 'हे' सुपरहिट चित्रपट, एकदा नक्की पाहाच!

मुंबई : मैत्री म्हणजे विश्वास, साथ, त्याग आणि आयुष्यभर जपला जाणारा नात्याचा धागा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या

Face Serum : सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड...तुमच्या त्वचेसाठी काय योग्य?

 सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड... यापैकी कोणते सीरम तेलकट त्वचेवर आणि कोणते कोरड्या त्वचेवर

Giloy : गुळवेल घरी कशी वाढवावी? सोपी पद्धत आणि योग्य काळजी

आजच्या काळात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. अशा अत्यंत