अमेरिकेने दहशतवाद्यांच्या ७२ ठिकाणांवर केले हल्ले; सीरियात युद्धसदृश परिस्थिती

सीरिया : सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई करत इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन हॉकआय’ अंतर्गत सीरियातील दहशतवाद्यांच्या सुमारे ७० ठिकाणांवर बॉम्बहल्ले करण्यात आले.


गेल्या आठवड्यात मध्य सीरियातील पालमीरा भागात अमेरिका आणि सहयोगी दलांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक स्थानिक अनुवादकाचा मृत्यू झाला, तर तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले आहे.


हेगसेथ यांनी सांगितले की, ही कारवाई इसिसच्या थेट ठिकाणांवर केंद्रित होती. ही नवीन युद्धाची सुरुवात नसून अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा ठोस बदला आहे. जगात कुठेही अमेरिकन नागरिक किंवा सैन्यावर हल्ला झाला, तर अमेरिका हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.


अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य सीरियामध्ये करण्यात आलेली ही हवाई कारवाई अत्यंत अचूक आणि व्यापक होती. इसिसशी संबंधित डझनभर तळ, साठवणूक केंद्रे आणि हालचालींच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.


दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. इसिसकडून अमेरिकन सैनिकांची क्रूर हत्या झाल्यानंतर आता प्रत्युत्तर कारवाई सुरू झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. शहीद सैनिकांना लष्करी सन्मानानं मायदेशी आणण्यात आले असून त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हवाई हल्ल्यांमुळे सीरियातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता असून मध्यपूर्वेत घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष ठेवले जात आहे.

Comments
Add Comment

बाबा वांगा ची भविष्यवाणी जगावर येणार मोठं संकट व्हेनेझुएलावर हल्ला हा भविष्यवाणीचा इशारा

मुंबई : सध्या जागतिक राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव जगाच्या

व्हेनेझुएला नंतर ट्रम्पचे नवे टार्गेट ठरले, या देशाला दिल्या धमक्या

वॉशिंग्टन डीसी : ड्रग्जचे कारण देत अमेरिकेने तेलासाठी व्हेनेझुएला विरोधात लष्करी कारवाई केली. व्हेनेझुएलाचे

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला

देशात आणीबाणी जाहीर, रस्त्यांवर रणगाड्यांचा संचार नवी दिल्ली : लॅटिन अमेरिकेतील राष्ट्र व्हेनेझुएला व अमेरिका

मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा महायुद्ध

नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना

US attack on Venezuela : हातात बेड्या, डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्राध्यक्षाला आणलं उचलून, ट्रम्प यांच्याकडून Photo जारी

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने संपूर्ण

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अटक

काराकस : ड्रग्जचे कारण देत तेल विहिरींवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. यानंतर