मुंबई : मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच सोशल मीडिया अकाउंट वर ऍक्टिव्ह असते. तिच्या रील मधून ती मजेशीर असे किस्से शेअर करत असते. तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अगदी मजेशीर पणे वर्णन करत ती तिच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. मग ते किस्से तिच्या आईच्या, बाबांचे अगदी घरातील कामवाल्या बाईचे ही असतात.. आणि त्यात लोकांना सर्वात जास्त आवडणारे किस्से ते म्हणजे छबिल आणि गोदोचे म्हणेजच तिच्या लाडक्या जुळ्या मुलींचे
क्रांती रेडकर हीच लग्न भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत झाले आहे. बरेंच वर्ष सुरक्षेच्या कारणास्तव ती तिच्या मुलींचे चेहरे न दाखवता व्हिडीओ शेअर करत होती. त्यामुळे क्रांतीच्या जुळ्या मुली कशा दिसतात ? हे पाहण्याची ईच्छा चाहत्यांना होती.
क्रांतीने नुकत्याच आदेश बांदेकर यांच्या मुलाच्या म्हणेजच सोहम बांदेकर याच्या लग्नाला सहकुटुंब हजेरी लावली होती. आणि त्याच दिवशी तिच्या मुलींचे चेहरे तिच्या चाहत्यांना बघायला मिळाले.
पण, त्यानंतर क्रांतीनं स्वतःच्या अकाउंटवरुन एक रिल शेअर करुन स्वतःच मुलींचे चेहरे रिविल केलेले. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रांती रेडकरनं छबिल आणि गोदोच्या जन्मावेळीचा किस्सा शेअर केला आहे. त्यावेळी जुळी मुलं होणार याबाबत क्रांतीला जराशीही कल्पना नव्हती, त्यानंतर मात्र ज्यावेळी तिला जुळं होणार असल्याचं कळालं, त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन हादरली होती, अशी माहिती क्रांती रेडकरनं दिलेली.
क्रांती म्हणाली, "मी जेव्हा पहिल्या सोनोग्राफीला गेले, तेव्हा एवढंच कळलं होतं की, मी प्रेग्नंट आहे... पहिल्या सोनोग्राफीला गेल्यावर ज्या डॉक्टर होत्या, त्या पोटावरुन काहीतरी यंत्र फिरवत होत्या. त्यावेळी डॉक्टर म्हणाल्या, सर्व ठीक वाटतंय... नंतर डॉक्टरांनी मला बघायला सांगितलं आणि म्हणाल्या, बेबी नंबर १ ठीक आहे... आणि बेबी नंबर २ दोघेही ठीक आहेत. हे ऐकताच बेबी नंबर १, २ हे काय आहे? मला ट्विन्स होणार आहेत का? असं मी डॉक्टरांना विचारलं... मग त्यांनी अगदी थंडपणे होकार दिला. डॉक्टर शांत होत्या, पण माझ्या पायाखालची जमीन जवळपास हलली होती...", असं क्रांती रेडकर म्हणाली.
दरम्यान, क्रांती रेडकरच्या मुलींची नावं जीया आणि जायदा अशी आहेत. पण ती त्यांना प्रेमाने छबील व गोदो असे म्हणते. क्रांतीनं ज्यावेळी छबिल, गोदोचे चेहरे रिविल केलेले, त्यावेळी त्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी हॉर्ट इमोजी देत रिअॅक्ट केलेलं. तर, क्रांतीच्या दोन्ही मुलींचं कौतुकही केलेलं. अनेकांनी दोन्ही मुली क्रांती सारख्या दिसत असल्याचं म्हटलेलं.