रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या मास्टरक्लास या उपक्रमाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त योग जुळून आला. या उपक्रमाचा विषय “आउट ऑफ दी बॉक्स “हा होता . कार्यशाळा नालीदार (कॉरुगेटेड) व पॅकेजिंग बॉक्सचा कला प्रतिष्ठापना (Art Installation) या माध्यमासाठी सर्जनशील पुनर्वापर कसा करता येतो याची ओळख करून देते. दैनंदिन वापरातील टाकाऊ साहित्याचे अर्थपूर्ण, मोठ्या आकारातील कलाकृतींमध्ये रूपांतर करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे, ज्यातून कल्पना, भावना आणि सामाजिक मूल्ये व्यक्त केली जातात. याचे मार्गदर्शन माजी विद्यार्थी डॉ. सुमित पाटील यांनी केले . त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन लाभला.


रचना संसद महाविद्यालयाला जशी २५  वर्षे पूर्ण झाली तसे आउट ऑफ दी बॉक्स जाऊन पुटठ्याचा बॉक्स पासून दोन नवीन उपक्रम घेण्यात आले. ज्यात या बॉक्स पासून पौराणिक काळातील खेळ जसे पंचिशी बनवणे हा उपक्रम होता . या खेळात विविध शैक्षणिक पायऱ्या दर्शविण्यात आल्या होत्या . एका गटाने वृक्षाद्वारे इतिहासातील २५ तत्वांचा उल्लेख केला .


ही कार्यशाळा शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकतेवरही भर देते, ज्यामुळे टाकाऊ साहित्य हे एक मौल्यवान संसाधन म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित होते. बॉक्स कापणे, दुमडणे, थर लावणे आणि जोडणी करून सहभागी कुटुंब, समाज, पर्यावरण, आठवणी किंवा कल्पनाशक्ती यांसारख्या विषयांची अभिव्यक्ती करतात. असे महाविद्यालाच्या मुख्याध्यापिका डॉ अदिती झा यांनी आपले मत व्यक्त केले.

Comments
Add Comment

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच

राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी