मुंबई विमानतळावर विक्रमी प्रवासी वाहतूक

नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा


मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)ने नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तम प्रवासी वाहतूक कामगिरीची नोंद केली. सणासुदीचा काळ आणि हिवाळ्यामध्ये प्रवासासाठी वाढलेल्या मागणीमुळे या महिन्यादरम्यान ४८ लाख ८८ हजारांहून अधिक प्रवाशी संख्या नोंदवली गेल्याने विक्रमी टप्पा गाठला आहे.


सीएसएमआयएने नोव्हेंबर महिन्यातील १५, २२ व २९ या तीन तारखेला अव्वल प्रवासी वाहतूक रेकॉर्ड्स स्थापित केले आहेत. विमानतळाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी १ लाख ७६ हजार प्रवाशांसह आतापर्यंतच्या सर्वोच्च एका दिवसात प्रवासी आकारमानाची नोंद केली.


आंतरराष्ट्रीय गंतव्यांमध्ये दुबई २,०९,७१४ प्रवाशांसह सर्वात वर्दळीचे गंतव्य ठरले, ज्यानंतर लंडन हीथ्रो (१,१२,०४३ प्रवासी) आणि अबु धाबी (१,००,२८४ प्रवासी) यांचा क्रमांक होता. देशांतर्गत गंतव्यांसंदर्भात दिल्ली ६,०९,६४६ प्रवाशांसह अव्वलस्थानी होते, ज्यानंतर बेंगळुरू (४,३६,३०१ प्रवासी) आणि चेन्नई (२,०७,६९२ प्रवासी) यांचा क्रमांक होता.


२९ नोव्हेंबर रोजी प्रवास केलेल्या एकूण १.७६ लाख प्रवाशांपैकी जवळपास १.२२ लाख देशांतर्गत प्रवासी होते, तर ५४,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. या टप्प्यापूर्वी सीएसएमआयएने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी १,०३६ च्या आतापर्यंतच्या सर्वोच्च दैनंदिन एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्सची नोंद केली, ज्यामधून गर्दीच्या प्रवास कालावधीदरम्यान विमानतळाची उत्तम ऑपरेशनल सुसज्जता दिसून येते.


२९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च प्रवासी आकारमान असलेले आंतरराष्ट्रीय गंतव्य होते दुबई (७,२०० प्रवासी), लंडन हीथ्रो (४,७६६ प्रवासी), अबु धाबी (३,२१३ प्रवासी), सिंगापूर (३,०५४ प्रवासी) आणि दोहा (२,३६९ प्रवासी). देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रमुख गंतव्य जसे दिल्ली (२२,७०३ प्रवासी), बेंगळुरू (११,५६५ प्रवासी), चेन्नई (७,५७८ प्रवासी), कोलकाता (६,६६७ प्रवासी) आणि हैदराबाद (६,५०७ प्रवासी) यांनी प्रबळ मागणीची नोंद केली.


भारतातील सर्वात वर्दळीचे व सर्वोत्तम कनेक्टेड एअरपोर्ट्स असलेल्या सीएसएमआयएने वाढत्या प्रवासी आकारमानाची पूर्तता करणे सुरू ठेवले आहे, तसेच अधिक वाहतूक कालावधीदरम्यान सुलभ ऑपरेशन्सची खात्री घेत आहे. विमानतळाच्या नोव्हेंबर २०२५ मधील उत्तम कामगिरीमधून पसंतीचे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गेटवे म्हणून मुंबईचे स्थान अधिक दृढ झाले आहे, जे आगामी महिन्यांमध्ये वाढत्या प्रवास मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहे.


अव्वल एका दिवसाचा प्रवासी वाहतूक रेकॉर्ड्स

दिनांक                  प्रवासी संख्या एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स

२९ नोव्हेंबर २०२५   १.७६ लाख    १,०१९

२२ नोव्हेंबर २०२५   १.७२ लाख    १,०२१

१५ नोव्हेंबर २०२५   १.७२ लाख    १,०२६
Comments
Add Comment

आनंदाची बातमी! हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना पुन्हा एकदा पुत्ररत्न

लोकप्रिय विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना पुन्हा एकदा पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. भारतीने आज

यंग, क्रेझी आणि फुल मजा: आमिर खान प्रोडक्शन्सची ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित!

आमिर खान प्रोडक्शन्सने आपली नवी जासूसी कॉमेडी ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ अतिशय मजेशीर आणि हटके अंदाजात जाहीर

भाईंदरच्या गल्लीत बिबट्याची दहशत, पारिजात निवासी सोसायटीत बिबट्याने केला तरुणीवर हल्ला

भाईंदर : भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत ही वाढत चालली असताना

आजचे Top Stock Picks- 'हे' ३ शेअर मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी उत्तम! ब्रोकरेजचा सल्ला

प्रतिनिधी: आज जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) व मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने मध्यम व

अहमदाबादमध्ये आज भारत - द. आफ्रिका निर्णायक लढत

गिल दुखापतग्रस्त, संजू सॅमसनला संधी?; सूर्याच्या फॉर्मने वाढवली संघाची चिंता अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका

मध्यरात्री झोपेतच विद्यार्थ्यांचे केस आणि भुवया कापल्या!

चास आश्रमशाळेतील प्रकार मोखाडा : मोखाडा तालुक्यातील चास आश्रमशाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत घडलेल्या