महाराष्ट्रभूषण राम सुतार यांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वनजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली.


अंत्यसंस्कारापूर्वी सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह स्व. सुतार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


गेल्याच महिन्यात सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४′ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला होता. राम सुतार यांनी जगभर २०० हून अधिक शिल्प बनवली आहेत. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत. राम सुतार यांना पद्मश्री व महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते. काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तो पुतळाही राम सुतार यांनी साकारला होता. राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.


राम सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण पुतळे साकारले. स्टॅच्यू ऑफ युनिटीची संपूर्ण डिझाईन त्यांनीच तयार केला असून, हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे व उल्लेखनीय कार्य मानले जाते. भारतीय कला व संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत राम सुतार यांनी ५० हून अधिक भव्य मूर्ती निर्माण केल्या. यामध्ये संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या मूर्तीचा विशेष उल्लेख केला जातो. या मूर्तीच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांसारख्या देशांमध्येही पाठवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची