भाईंदरच्या गल्लीत बिबट्याची दहशत, पारिजात निवासी सोसायटीत बिबट्याने केला तरुणीवर हल्ला

भाईंदर : भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत ही वाढत चालली असताना मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलाव रोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत एका घरात बिबट्या थेट घुसला. यावेळी एका घरात असलेल्या २५ वर्षांची एक तरूणी आणि ३ पुरूष असा एकूण चार जणांवर बिबट्याने हल्ला केला. घरातील व्यक्तींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली.


मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ३ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे .


वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र घटनास्थळी नागरिकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी बिबट्याला एका रूममध्ये बंद करून ठेवले असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल