मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे तिकीट 'वेटिंग' किंवा 'RAC' असल्यास ते शेवटच्या क्षणापर्यंत कन्फर्म होईल की नाही, या चिंतेत प्रवाशांना राहावे लागत होते. प्रवाशांची हीच मानसिक ओढाताण थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रिझर्व्हेशन चार्ट (Reservation Chart) तयार करण्याच्या नियमात मोठे बदल केले आहेत. आता प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी बराच वेळ आधी आपले तिकीट स्टेटस समजणार आहे, ज्यामुळे त्यांना आपला पुढील प्लॅन तयार करणे सोपे होईल.
ढाका : बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावाचे नेतृत्व करणारे आणि 'इंकलाब मंच'चे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली ...
नेमका बदल कोणता?
सकाळच्या प्रवासासाठी रात्रीच माहिती : जर तुमची ट्रेन सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत असेल, तर तिचा पहिला चार्ट आता आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंतच तयार केला जाईल. यामुळे प्रवाशांना रात्रीच आपली सीट निश्चित झाली आहे की नाही, हे स्पष्ट होईल.
दुपार आणि रात्रीच्या गाड्या : दुपारी २ नंतर सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट प्रवासाच्या ४ ते ६ तास आधीच उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून स्टेशनवर जाण्यापूर्वी प्रवाशांना पूर्ण माहिती असेल.
मध्यरात्रीच्या गाड्यांसाठी १० तास आधी चार्ट : मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांबाबत रेल्वेने अधिक सतर्कता दाखवली आहे. या गाड्यांचा तिकीट चार्ट प्रवासाच्या १० तास आधीच प्रसिद्ध होईल.
प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?
रेल्वेच्या ८७ टक्के तिकिटांचे बुकिंग आता ऑनलाइन होते. जर ऑनलाइन वेटिंग तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते चार्ट तयार झाल्यावर आपोआप रद्द होते. आता चार्ट लवकर तयार होणार असल्यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द झाल्याची माहिती लवकर मिळेल आणि पर्यायाने त्यांच्या खात्यात रिफंड (पैसे परत मिळण्याची) प्रक्रियाही वेगाने सुरू होईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना ऐनवेळी स्टेशनवर जाऊन होणारी धावपळ आता टाळता येणार आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांना त्यांचा प्रवास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल.