मुंबई: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी या अंमली पदार्थांच्या प्रकरणात राजकीयदृष्टया आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगतानाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात शिंदे यांचा बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लंडन : हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर गेलेला आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी ...
मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. या परिषदेदरम्यान देशातील आघाडीचे सिमेंट निर्माता कंपनी असलेल्या बांगर उद्योगाने चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र प्रदान केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.