मेहता–सरनाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई

मीरा-भाईंदरमध्ये युतीची शक्यता धुसर


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वर्चस्वाची चुरस तीव्र झाली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही नेते अधिकाधिक जागांची मागणी करत असल्याने भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे.


राज्यातील बहुतेक महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचे भाकित नेते करत असले, तरी मीरा-भाईंदरमध्ये मात्र वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६१ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर इतर पक्षांतील चार नगरसेवक भाजपमध्ये सामील झाल्याने भाजपची संख्या ६५ वर पोहोचली आहे.


यंदा युती करायची असल्यास, मागील निवडणुकीत भाजप व शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ संबंधित पक्षांच्या वाट्याला द्यावेत आणि उर्वरित जागांची विभागणी करावी, अशी भूमिका मेहता यांनी मांडली आहे. मात्र, मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्यावेळेसारखी परिस्थिती राहिलेली नसून शहरात शिवसेनेचे वर्चस्व वाढल्याचा दावा करत ५०-५० जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे केला आहे. सन्मानपूर्वक जागावाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेतही सरनाईक यांनी दिले आहेत.


समान वाटप झाल्यास भाजपला केवळ ४८ जागांवर समाधान मानावे लागेल, त्यामुळे या प्रस्तावाला भाजप तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सरनाईक यांच्या “आम्ही भीक घेणार नाही” या विधानावरून भाजपमध्ये संताप असून, “आम्ही भीक दिलीच नाही, तर त्यांनी घेतली कुठून?” असा प्रतिप्रश्न नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे. या वादामुळे दोन्ही पक्षांतील वितुष्ट अधिकच वाढले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यंदाची मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

कळव्यात भाजपची ५० टक्के जागांची मागणी

प्रचाराचा नारळ फुटला! पालिकेत युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची भूमिका ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या

नवीन वर्षात ठाणे मेट्रो-४ सुरू होणार

कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतचा प्रवास होईल सुलभ मुंबई : मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल

ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकाम नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा

ठाणे महापालिका निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू

१९४२ केंद्रांवर ९७१० कर्मचारी तैनात ठाणे : ठाणे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांतील

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये