रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार?


अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते; परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असून, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


अलिबाग, कर्जत, खोपोली, पेण, उरण, महाड, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, माथेरान, रोहा या दहा नगरपालिकांचा समावेश असून, २ डिसेंबरला घेण्यात आलेल्या मतदानानंतर मतमोजणीपूर्वी जय-पराजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येकालाच विजयाची खात्री असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते गुलाल आमचाच म्हणत असून, मात्र मतदाराने कौल कोणाच्या बाजूने दिला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. न्यायालयीन घडामोडींमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतमोजणी आणि निकालासाठी प्रतिक्षा करावी लागली आहे. त्यामुळे विशेषतः उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक निकालासंदर्भातील चर्चेला प्रत्येक शहरात ऊत आला आहे. रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास बहुतांश नगरपालिकांमध्ये सरळ लढती पहायला मिळाल्याने या लढती तुल्यबळ ठरतील, असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात आहे. युती आघाड्यांची गणिते बिघडली आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे उदयास आली, हे मतदारांच्या पचनी पडले आहे का, ते २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


रायगड जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष एकत्र गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे येऊ शकले नाहीत. शिवसेना शिंदे दोन्ही पक्ष आमने-सामने लढल्याने दोन्ही पक्षांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे. मात्र, निकालाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. उमेदवारांपेक्षा त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उत्साहाने विजय आपलाच असल्याचे ठासून सांगत आहेत. यावरून मतांच्या आकड्यांसह पैजा लागत आहेत.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,