कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी खास भारत भेटीसाठी आला खरा, पण त्याची झलकही सर्वसामान्य प्रेक्षक बघू शकला नसल्यामुळे भारतीय फुटबॉलचे माहेरघर असलेल्या सॉल्ट लेक मैदानावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
कोलकाता येथील सॉल्ट लेक मैदानावर मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये मोजले होते. मात्र मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकाता राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने काल (१८ डिसेंबर)ला सॉल्टलेक स्टेडियमला भेट देत गोंधळ घालणाऱ्यांपैकी एकाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे, ज्यामुळे अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे.
मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली ...
दुसरीकडे, पोलिसांच्या अपयशामुळेच ही अनुचित घटना घडली. पोलीस हे राज्य सरकारचे कठपुतळी आहेत, त्यामुळे राज्य पोलीस एसआयटीमध्ये असतील तर निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. पोलीस काम करत आहेत हे दाखवण्यासाठी निष्पाप तरुणांना अटक केली जात आहे. भगवा छावणी त्या सर्वांना कायदेशीर मदत करेल. मेस्सीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांहून अधिक घोटाळा झाला," असे अधिकारी म्हणाले.