मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारींच्या विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेची मोहीम.
जबाबदारी वाटप करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व २२७ जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती आज रंगशारदा येथे सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेच्या पारड्यात ज्या जागा पडतील त्या ठिकाणच्या उमेदवारांची निवड याच मुलाखतींच्या माध्यमातून होईल.
जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या महायुतीच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या प्रचाराची जबाबदारी सोपवली जाणार आहे .
पालिका निवडणूक महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असून १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी दिली.