माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी नैतिकतेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. अजित पवार यांनी गुरुवारी तो स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.


कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ झाली. कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांच्याकडील खाते काढून घेण्याची शिफारस बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली. त्यानुसार, कोकाटे यांच्याकडील खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर, कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी समाज माध्यमांद्वारे दिली.




 

 


काय म्हणाले अजित पवार?



  1. याविषयी अजित पवार म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

  2. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असेही अजित पवार म्हणाले.

Comments
Add Comment

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी