मोहित सोमण: आज प्रामुख्याने भूराजकीय अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने सोने चांदी प्रचंड महाग झाले आहे. प्रति तोळा सोने जवळपास १३५००० पातळीवर पोहोचले असून प्रति किलो चांदीने जवळपास २१०००० रूपये पार केले आहेत. कारण 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३४८४, २२ कॅरेटसाठी १२३६०, १८ कॅरेटसाठी १०११३ रूपयांवर पोहोचल्या आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीनुसारच प्रति तोळा सोन्याच्या किंमती २४ कॅरेटसाठी १३४८४० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२३६०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०११३० रूपयांवर पोहोचल्या आहेत. माहितीनुसार मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३४७४ रूपये, २२ कॅरेटसाठी १२३६० रूपये, १८ कॅरेटसाठी १०११३ रूपयांवर पोहोचले आहेत.
यासह भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याचे दर प्रति किलो संध्याकाळपर्यंत ०.३५% घसरुन १३४४२४ रूपयांवर पोहोचले आहेत. सकाळी किरकोळ उसळलेले दर जागतिक स्तरावर मर्यादित झाल्याने संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३४% घसरण झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात ०.२८% घसरण संध्याकाळपर्यंत झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४३२६.४८ औंसवर गेली आहे.
गेल्या १८ दिवसात सोने प्रति ग्रॅम २४ कॅरेटचे दर ४७६ रुपयांनी उसळले आहेत तर २२ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम दर ४०० रूपयांनी उसळले आहेत. म्हणजेच सोन्यात प्रति ग्रॅम दरात १८ दिवसात ३.३४% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
चांदीतही उच्चांकी वाढ कायम!
काल वाढलेल्या उच्चांकी पातळीवरून आणखी चांदी महागली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचा प्रति ग्रॅम दर आज २११ रूपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २११००० रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार एकाच दिवसात चांदीच्या किंमतीत आज ३००० रूपये वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात ११९०० रूपयांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी १० ग्रॅम दर २११०० रूपये, प्रति किलो दर २११०० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६४% घसरण झाल्याने दरपातळी २०६१०० रुपयांवर पोहोचली आहे.
सोने चांदी आणखी काय उसळतीय?
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या युएस बाजारातील अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचा फटका संपूर्ण जगभरातील कमोडिटी बाजारांना बसतो. आज घसरलेल्या पेरोल आकडेवारीसह आगामी प्रतिक्षित महागाई आकडेवारीचा दबाव सोन्यात बसल्याने सोने आज मोठ्या प्रमाणात वाढले.
गुंतवणूकदारांनी अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला महत्व दिल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच मंगळवारी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला चालना मिळाली आहे ज्यात प्रामुख्याने नोव्हेंबरमध्ये बिगरशेती (Non Farm Payroll) क्षेत्रातील रोजगारात झालेली किरकोळ वाढ आणि वाढलेला बेरोजगारीचा दर यांचा समावेश आहे.अमेरिकेतील बेरोजगारीचा दर चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढली आहे.
डिसेंबर महिन्यासाठी अपेक्षेपेक्षा कमकुवत असलेल्या खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (Purchasing Manager Index PMI) आकडेवारीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत असल्याची चिन्हे अधिक स्पष्ट झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या उशिरा जाहीर झालेल्या किरकोळ विक्रीच्या आकडेवारीनेही मागील महिन्याच्या तुलनेत वाढ मंदावल्याचे दर्शवले.
सोन्याबाबत वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने काय म्हटले?
सोन्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली तेजी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि २०२६ पर्यंत किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे तसेच त्या प्रति औंस ६००० डॉलरपर्यंत (सुमारे ५४१९२० रुपये प्रति औंस, आणि १.९० लाख रुपये प्रति १० ग्रॅम) पोहोचू शकतात असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी आज सांगितले.
चांदीच्या बाबतीत विशेषतः चांदीच्या जागतिक साठ्यांमध्ये आलेली घट, वाढलेली औद्योगिक मागणी आणि अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत चांदीचा अधिकृत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती आज ४.८९ टक्क्यांनी वाढून २०७४३५ पातळीवर स्थिरावली आहे. तज्ञांच्या मते ईटीएफमधील जोरदार गुंतवणूक आणि किरकोळ खरेदीदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे तेजीच्या भावनांना आणखी बळ मिळाले आहे. ज्यामुळे चांदीच्या बाबतीत आगामी वर्षात बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. वाढलेली चांदीच्या वैयक्तिक मागणीसह वाढलेली औद्योगिक मागणी (सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर) हे महत्वाचे ट्रिगर ठरल्याने चांदी वेगाने वाढत आहेत तर आज चीनने २०२६ पासून चांदीच्या निर्यातीवर कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केल्यानंतर पुरवठ्यासंबंधीच्या चिंता वाढल्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगाऊ खरेदी सुरू झाली असे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले.