ठाणे महापालिका निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू

१९४२ केंद्रांवर ९७१० कर्मचारी तैनात


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांतील इच्छूक निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले असून त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेच्या निवडणुक विभागानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाण्यात १९४२ मतदान केंद्र असणार आहे तर, या केंद्रावरील कामांसाठी ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.


शहरातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६७ इतकी असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्र ही तळमजल्यावर तयार करण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


ठाणे महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण ३३ प्रभाग असणार आहेत. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणूक विभागाने उरकली असून त्यापाठोपाठ आता अंतिम मतदार याद्याही जाहीर केल्या आहेत. याशिवाय, प्रभागातील मतदान केंद्रही निश्चित केली आहेत.


२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. तर, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ३३ प्रभाग होते आणि मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती. या मतदार संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु कोरोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही.


त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार यंदा निवडणूक होत असली तरी २०१७ साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण १६ लाख ४९ हजार ८६७ इतके मतदार आहेत. त्यात ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० स्त्री आणि १५९ इतर मतदार आहेत.

Comments
Add Comment

ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल

ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकाम नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये

ठाण्यात अजित पवार आजमावणार स्वबळ

तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा

ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र