गुरूग्राम: एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड (एसीएमई सोलार) या अक्षय उर्जा (Renewable Energy) आपल्या नव्या विस्तारासाठी व पायाभूत सुविधेसह आर्थिक बाबीत रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी कंपनीने आपल्या विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून कर्ज उभारण्याचे घोषित केले. या आपल्या उपकंपनी (Subsidiary) कंपन्यांच्या विविध ऊर्जा प्रकल्पाला वित्तीय पुरवठा करण्यासाठी कंपनीने एकूण ४७२५ कोटी मूल्यांकनांचे कर्ज विविध बँकाकडून मिळवले आहे. कंपनीने संबंधित आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्येही स्पष्ट केली आहे.
कंपनीच्या मते, केवळ ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामासाठी निधी उभारण्यासाठी आणि वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करण्यासाठी नाही तर आपल्या आर्थिक भांडवली रचना सुरळीत करण्यासाठी हे कर्ज उभारण्यात येणार आहे.१८ ते २० वर्षांच्या कालावधीसाठी वित्तपुरवठा आणि पुनर्वित्तपुरवठ्यासाठी (Refinancing) प्रकल्पबांधणीसाठी कर्जाचा समावेश आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा (Greenfield Refinancing) करण्यासाठी ३०० मेगावॉटच्या एसीएमई सिग्मा एफडीआरई प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी लिमिटेड) कडून २७१६ कोटी रुपये आणि १५० मेगावॉटच्या एसीएमई प्लॅटिनम सोलार + ईएसएस प्रकल्पासाठी नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (NaBFID) कडून ८०० कोटी रुपयांचा पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प वित्तपुरवठा प्राप्त केला आहे. अशी प्राथमिक माहिती पुढे आली. यापूर्वीच दोन्ही प्रकल्प सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत असे कंपनीने स्पष्ट केले होते.
कंपनीच्या दाव्यानुसार, ३०० मेगावॉटच्या एसीएमई सीकर सोलार प्रकल्पाच्या कार्यान्वित प्रकल्पाच्या पुनर्वित्तपुरवठ्यासाठी कंपनीने येस बँकेकडून १२०९ कोटी रुपये गोळा केले आहेत. ज्यामुळे आता कर्जाच्या खर्चातील सुरुवातीला १७० बीपीएस आणि अखेरीस १९५ बीपीएसची कपात झाली असेही कंपनीने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, एसीएमई सोलारसाठी येस बँकेकडून हा पहिला दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठा आहे.
या वित्तपुरवठ्याच्या फेरीमुळे,चालू आर्थिक वर्षात कंपनीने सुमारे १०५९० कोटी रुपयांचा ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा सुरक्षित केला आहे ज्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमधील स्वाक्षरी केलेल्या पीपीएच्या ९०% पेक्षा जास्त कर्जाची एकूण तरतूद करणे कंपनीला शक्य झाले आहे.
याव्यतिरिक्त कंपनीने सुमारे ३३८० कोटी रुपयांच्या कर्जाचा पुनर्वित्तपुरवठा केल्याने पुनर्वित्तपुरवठा केलेल्या कर्जावर सुमारे १३५ बीपीएस दर कपात साध्य झाली आहे आणि इतर प्रकल्पांसाठी सुमारे ४०३५ कोटी रुपयांच्या कर्जावर अतिरिक्त सुमारे ६० बीपीएस दर कपात झाली आहे असेही म्हटले.
नॉन-फंड आधारित मर्यादा एसीएमई सोलारने या वर्षी आयसीआयसीआय बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, फर्स्ट अबू धाबी बँक, एक्झिम बँक इत्यादी विविध बँकांकडून नॉन-फंड आधारित कर्ज मर्यादांचाही विस्तार केला आहे. या मर्यादा प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात ट्रेड फायनान्सद्वारे कर्जाचा खर्च कमी करण्यास मदत करतात.तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी ३.०२ वाजेपर्यंत १.२९% अंकांने घसरण झाली होती. ज्यामुळे कंपनीचा शेअर २३३ रूपये प्रति शेअर व्यवहार करत होता.






