Tata Sierra Record Bookings: पहिल्या दिवशी टाटा सिएराला तुफान प्रतिसाद, १ दिवसात 'इतक्या' गाड्यांचे बुकिंग

मोहित सोमण:टाटा सिएरा (Tata Sierra) काल १६ डिसेंबरपासून नवी विक्री नोंदणी (Sales Registration) सुरु केले होते. त्यामुळे नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार केवळ १ दिवसात ७०००० गाड्यांचे बुकिंग झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासह १.३५ लाख ग्राहक अर्जदार आपल्या संभाव्य मालकीच्या गाडीतील प्राधान्यक्रम सुनिश्चित करून अर्ज करणारे आहेत असे कंपनीचा डेटा स्पष्ट करतो. आपल्या भावना व्यक्त करताना, बुकिंगच्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी ग्राहकांचे जोरदार प्रतिसादाबद्दल आभार मानले असून 'परंपरा मोडून नवीन मानदंड (Parameters) स्थापित करण्याच्या आपल्या वारशाला खरे उतरत, टाटा सिएराने एका मध्यम आकाराच्या एसयूव्हीकडून काय अपेक्षा करता येईल याची पुनर्कल्पना करून एक नवीन प्रीमियम मिड-एसयूव्ही श्रेणी तयार केली आहे. जागा, आराम, लक्झरी, सुरक्षा आणि दैनंदिन उपयुक्तता या मुद्यावरील उत्पादकता वाढवून सिएराने या सेगमेंटसाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे व ती कार प्रगती, व्यक्तिमत्व आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक म्हणून उभी आहे.' असे म्हटले आहे.


टाटा सिएरा स्मार्ट+, फ्युअर, फ्युअर +, अँडव्हेचर, अँडव्हेचर प्लस, अकंमप्लिश, अकंमप्लिश + या सात व्हेरीएंटमध्ये बाजारात उपलब्ध असणार आहे .सिएरा तीन इंजिन पर्यायांसह येते. टाटा मोटर्सने आपल्या हायपेरियन मालिकेतील दोन नवीन पेट्रोल इंजिन लाँच केले आहेत. पहिला पर्याय १.५-लिटरचे नॅचरली ॲस्पिरेटेड चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. दुसऱ्या पेट्रोल पर्यायामध्ये १.५-लिटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.


डिझेल व्हेरिएंटमध्ये १.५-लिटरचे टर्बोचार्ज्ड इंजिन असून ११६ एचपी पॉवरसह हे इंजिन उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार, इंजिन ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह हे उपलब्ध आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससह टॉर्क आउटपुट २६० एनएम आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह २८० एनएम आहे असे कंपनीने लाँच दरम्यान नमूद केले होते. ११.४९ ते २१.२९ लाखांपर्यंत (एक्स शो रूम) ही किंमत कारची असणार आहे. प्रत्यक्ष ऑन रोड किंमत प्रदेशानुसार विविध असू शकते.


यापूर्वी १९९१ साली या कारचे लाँचिग झाले होते पुन्हा नव्याने टाटा मोटर्सने आधुनिक फिचर्ससह नवी आवृत्ती बाजारात मिड एसयुव्ही सेगमेंटमध्ये केले आहे. थ्री डोअर लेआऊटसाठी प्रसिद्ध असलेल्या या गाडीत यंदा पाच डोअर लेआऊट असणार आहे. १५२५× ९२५ मिलीमीटर पॅनोरामिक सनरूफसह, ६२२ मिलीमीटर बूट स्पेस (VDA), ट्रिपल स्क्रीन डिस्प्ले, सोनिक शाफ्ट साऊंडबार, ५ जी कनेक्टिव्हिटी, IP बेस टेलिमॅटिक्स कमांडस, जेबीएलसह डॉल्बी ॲटमॉस, अलेक्सा, मॅप माय इंडिया, ओटीए इनाबल क्लाऊड, क्लाऊड बेस अँप्स, सेफ्टी व सिक्युरिटीज फिचर्ससह १.५ TGDI तंत्रज्ञान, ६ एअरबॅग अशा अनेक फिचर्ससह कार बाजारात पदार्पण करत आहे.


सेफ्टी फिचर्स पाहिल्यास, ADAS Level 2 (22 Features), Thinnest Headlamps, रिअर सनशेड व रिअर एसी वेंटस, थ्री रिलॅक्सेशन, ३ टचस्क्रीन डिस्प्ले, Colled Glovebox, ड्रायव्हर मेमरी सीट, स्वतंत्र पॅसेंजर स्क्रीन असे विविध फिचर्स देण्यात आल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले लाँच दरम्यान स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passes Away : आता दादांना नेतोय पण..." पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेताना जय पवारांना अश्रू अनावर!

बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच

अपघातावर राजकारण करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घाला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी होऊन सत्य समोर

महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना ममतांनी सुरू केले राजकारण, पवारांनी सुनावले

पुणे : तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी सकाळी बारामती

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा खर्च वाढला

संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च मुंबई : गोरेगाव मुलुंड