Stock Market Closing Bell: शेअर बाजारात घसरणच-आयटी,पीएसयु बँक, मेटल शेअर्समध्ये मात्र वाढ

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने शेअर बाजारातील चढउतार आजही कायम राहिल्याने अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १२०.११ अंकाने घसरत ८४५५९.६५ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ४१.५५ अंकाने घसरत २५८१८.५५ पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात युएस भारत व्यापारी करारावर अस्थिरता, भूराजकीय अस्थिरता, डॉलरच्या निर्देशांकातील वाढ, मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक अशा विविध कारणांमुळे घसरण झाली असूनही मजबूत फंडामेंटलसह घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या मजबूत गुंतवणूकीमुळे काही प्रमाणात बाजारात आधार मिळाला. बँक निर्देशांकातही किरकोळ घसरण कायम असली तरी पीएसयु बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढ झाल्याने बँक निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. याशिवाय मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली नाही. दरम्यान पीएसयु बँक, आयटी, मेटल, फार्मा निर्देशांकात वाढ झाली इतर निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडिया, रिअल्टी, हेल्थकेअर, केमिकल्स, फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक या निर्देशांकात झाली.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ इंडिया सिमेंट (७.८८%), इंद्रप्रस्थ गॅस (५.०८%), किर्लोस्कर ऑईल (४.४३%), रिलायन्स पॉवर (३.१२%), आदित्य बिर्ला फॅशन (२.९९%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.९६%), कॅनरा बँक (२.०७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण अक्झो नोबेल (१३.६५%), सारेगामा इंडिया (६.६०%),आयओबी (६.२१%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.६४%), डेटा पँटर्न (३.४४%), कोचिंग शिपयार्ड (३.६९%),प्राजइंडस्ट्रीज (३.६५%), कोलगेट पामोलीव (३.५८%), जीएमडीसी (३.५७%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक बाजारपेठेतील संकेत संमिश्र आहेत. जपानी रोखे उत्पन्नात वाढ होत आहे, त्यामुळे इक्विटी मूल्यांकनांवर दबाव आणि तरलता कमी होत असल्याचे दिसून येते, तर अमेरिकन कामगारांच्या मऊ आकडेवारीमुळे मंदीच्या चिंता वाढतात आणि अधिक अनुकूल फेडच्या अपेक्षा बळकट होतात. स्थानिक पातळीवर, रुपया स्थिर करण्यासाठी आरबीआयच्या प्रयत्नांमुळे दर-संवेदनशील क्षेत्रांना आधार मिळाला आहे. परदेशी गुंतवणूकदार निधी काढून घेत आहेत आणि उदयोन्मुख बाजारपेठा संघर्ष करत आहेत, तर विकसित अर्थव्यवस्था मजबूत आहेत, हे दर्शविते की गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांबद्दल अधिक सावध होत आहेत. चलन स्थिरता तात्पुरती दिलासा देत असली तरी, जागतिक अनिश्चितता आणि सतत परकीय विक्रीमुळे वाढीची शक्यता मर्यादित राहते, ज्यामुळे बाजारपेठा मंदीच्या पूर्वाग्रहाकडे झुकतात.'

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम