राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री


मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना आता बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. कोकाटेंकडे असलेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी पुढील निर्णय होईपर्यंत अजित पवारांकडे सोपविण्यात आली आहे.


कोकाटे यांच्याकडे असलेला मंत्रि‍पदाचा कार्यभार काढण्याची विनंती फडणवीसांकडून करण्यात आली. ती राज्यपालांनी मान्य केली. कोकाटे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे. या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलेली आहे.


माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. याआधी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला. सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण सुनावणी होण्याआधीच तब्येत बिघडल्याचे कारण देत कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.


कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधीमंडळ कार्यालय त्यांचा निर्णय घेणार आहे.


विधानसभेची निवडणूक जिंकल्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली. या सरकारमध्ये कृषीमंत्री झालेल्या कोकाटेंचे पद काही महिन्यांनी बदलण्यात आले. कोकाटे क्रीडामंत्री झाले. पण सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे दोषी ठरले. यानंतर कोकाटेंना बुधवार १७ डिसेंबर रोजी रात्री बिनखात्याचे मंत्री करण्यात आले.



धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहंची भेट


माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कोकाटेंचे मंत्रिपद आणि त्यांची आमदारकी धोक्यात असताना धनंजय मुंडेंनी अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री होते. पण करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. कौटुंबिक वादाची माध्यमातून चर्चा सुरू झाली. अखेर धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर धनंजय मुंडे अद्याप मंत्री झालेले नाहीत. पण आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे कोकाटे अडचणीत सापडल्यास धनंजय मुंडे यांना मंत्री केले जाणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

Share Market Updates : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव असूनही सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुधारणेचा कल

नवी दिल्ली : आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजार नीचांकी पातळीवरून

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स