लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ आहे तरी कसा, पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी..

दुबई :आयपीएलचा लिलाव अखेर पार पडला.या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने चाणाक्ष खेळी केली.मुंबई इंडियन्सकडे जास्त पैसे नव्हते,पण तरीही त्यांना फार कमी पैशांत जबरदस्त खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे लिलावासाठी तीन कोटी रुपयेही नव्हते.त्यामुळे मुंबईला या लिलावात नामांकित खेळाडू घेता आले नाही,पण तरीही मुंबईच्या संघाने यावेळी आपल्याकडे असलेल्या कमी पैशांतही चांगल्या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकला त्यांनी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले,पण त्यासाठी फक्त त्यांनी एक कोटी रुपयेच खर्च केले.त्यानंतर मुंबईच्या संघाने महाराष्ट्राच्या दानिश मालिवारलाही आपल्या ताफ्यात सामील केले आहे.त्याचबरोबर अथर्व अंकोलेकर, मयंत रावत आणि मोहम्मद इझहार यांनाही मुंबईने आपल्या संघात दाखल केले आहे.


आयपीएल २०२६ लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी:
क्विंटन डी कॉक (१ कोटी रुपये), दानिश मालेवार (३० लाख रुपये), मोहम्मद इझहार (३० लाख रुपये), अथर्व अंकोलेकर (३० लाख रुपये), मयंक रावत (३० लाख रुपये).


राखून ठेवलेले खेळाडू:
हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, रायन रिकलटन, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनझार, अश्वनी कुमार, दीपक चहर, विल जॅक्स, रघु शर्मा, राज अंगद बावा.


देवाण घेवाण करून संघात घेतलेले खेळाडू:
शेर्फेन रदरफोर्ड (गुजरात टायटन्स संघाकडून), मयंक मार्कंडे (केकेआर संघाकडून), शार्दुल ठाकूर (लखनौ सुपर जायंट्स संघाकडून).

Comments
Add Comment

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच

बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल! दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी