लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना रद्द झाला आहे. धुक्यामुळे या सामन्यात नाणेफेक झाली नाही. लखनऊचा सामना रद्द झाल्यामुळे आता फक्त अहमदाबादचा सामना बाकी आहे. मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादचा सामना जिंकल्यास भारत मालिका ३-१ अशी जिंकेल.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता अहमदाबादच्या टी ट्वेंटी सामन्यात काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.