अखेर तो गोड क्षण आलाच! आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधना अव्वल स्थानावर

नवी दिल्ली: भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याची माहिती दिली होती. स्मृतीचे लग्न, वडीलांची तब्येत, पलाशचे व्हायरल चॅट्स यासर्वावर स्मृतीच्या लग्न मोडल्याच्या पोस्टमुळे पूर्णविराम मिळाला. मात्र यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या मानसिक परिस्थितीची काळजी दिसून येत आहे. दरम्यान वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या वादळातून सावरताना स्मृती मानधनाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी तिची निवड झाली आहे. यामुळे स्मृतीने तिच्या लग्न मोडल्याच्या पोस्ट मध्ये लिहल्याप्रमाणे तिला आता तिच्या खेळातून सावरायला मदत होणार आहे.


आयसीसीने १६ डिसेंबर रोजी महिला एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये स्मृती दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डला मागे टाकत अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडविरुद्ध सात विकेट्सने मिळवलेल्या विजयात ३१ धावा काढल्यानंतर स्मृतीचे रेटिंग गुण ८११ राहिले, तर वोल्वार्ड ८१४ वरून ८०६ वर घसरल्याने स्मृती अव्वल ठरली आहे. तर टॉप १० मध्ये भारताची दुसरी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आहे दहाव्या स्थानावर आहे.




टॉप १० मध्ये कोण आहे?
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू टॉप १० मध्ये वर्चस्व गाजवत आहेत. अ‍ॅशले गार्डनर तिसऱ्या, बेथ मूनी पाचव्या, अ‍ॅलिसा हीली सहाव्या आणि एलिस पेरी संयुक्तपणे न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईनसोबत सातव्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज नवव्या स्थानावर असून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर १४ व्या स्थानावर आहे.


२०२५च्या महिला विश्वचषकात मानधनाने ८११ रेटिंग मिळवले आणि ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या. भारताने विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही आहे. मात्र आता त्यांचा मालिका सामना या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. जो २१ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यातील पहिले दोन सामने विशाखापट्टणममध्ये तर उर्वरित तीन सामने तिरुवनंतपुरम इथे खेळले जाणार आहेत.


Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच