अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार


अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ चे काम येत्या चार महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. मेट्रो ५, १२, १४ चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्यांना होणार आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा आहे. अंबरनाथ शहरासाठीही माझे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधी एकाच टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते पण २ डिसेंबरच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. ही निवडणूक पुढे गेली म्हणूनच अंबरनाथला येता आले असे मुख्यमंत्री म्हणाले.


अंबरनाथ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. भाजपचा विकासाचा अजेंडा सांगण्यासाठी इथे आलो आहे, मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच आपण शिवसेनेवर टीका करणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी बोलताना रेल्वे, मेट्रो प्रकल्पांची माहिती देत त्याचा अंबरनाथ, बदलापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका झाल्यास दर दहा मिनिटाला लोकल मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सर्व साध्या लोकल वातानुकूलीत करण्यासाठी २३८ रॅक्सची मागणी करत आहोत. लवकरच सर्व लोकल कोणत्याही भाडेवाढीविना वातानुकूलीत होतील, असेही फडणवीस म्हणाले.


अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाचा युवा आणि सुशिक्षित उमेदवार दिला आहे. त्या सनदी लेखापाल आहेत. त्या सर्व हिशोब ठेवतील आणि सर्वांचा हिशोब करतीलही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप उमेदवारांची स्वप्ने ही माझे स्वप्ने असून ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवकही निवडून द्यायला हवेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

धुक्यानं वाट लावली, लखनऊची टी ट्वेंटी रद्द झाली

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना

राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री

मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे महाराष्ट्रातले थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण आहे. याच पाचगणीत लाखो