अक्झो नोबेलचा शेअर धडाड! इंट्राडे १५% कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (Akzo Nobel India Limited) कंपनीचे शेअर आज जोरदार कोसळले आहेत. एका प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सुत्रांच्या वृत्ताच्या आधारे शेअर मधील वाढलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे शेअरमधील सेल ऑफ वाढले असून मागणी घसरल्याने शेअर थेट १५% कोसळला असल्याने ३०८० रूपये प्रति शेअर व्यवहार करत होता. सकाळी ११.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १२.७७% घसरण झाल्याने प्रति शेअर किंमत ३१६१.३० रूपयांवर व्यवहार करत आहे. काल एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने कंपनीने ब्लॉक डील केल्याचे अहवालात म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शेअर मोठ्या संख्येने कोसळला. माहितीनुसार अद्याप खरेदी व विक्रीदार यांची माहिती समोर आली नसली तरी ३१५९ रूपये प्रति शेअरसह १६३८.५ कोटीचे हे डील झाल्याचे सांगण्यात आले आहे.


अहवालातील आणखी एका माहितीनुसार, १२९०.६ रूपये फ्लोअर प्राईजसह ३१५० रूपये प्रति शेअर असा सौदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये खरेदीदारांना १३% प्रति शेअर सवलत देण्यासहित हा व्यवहार झाला असल्याचे अहवालात म्हटले जात आहे. कंपनीच्या प्रमोटरनी ९% हिस्सा या सौद्यासहित विकण्याचे ठरवले होते असे अहवालात म्हटले आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात जेएसडब्लू पेंटस कंपनीने या अक्झो कंपनीचे ६०.७% इतका प्रभावी हिस्सा खरेदी केला होता ज्यामुळे व्यवस्थापनाचे नियंत्रण जेएसडब्लूकडे आले होते.


यापूर्वी शेवटच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ९७ कोटी तुलनेत वाढत १६८२ कोटीवर पोहोचला होता. मात्र महसूलात मात्र १५% घसरण झाल्याने महसूल १८७४ कोटीवर पोहोचला होता. कंपनीच्या नफ्यातील शीर्ष (Topline) वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. तसेच कंपनीच्या खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ८६० कोटीवरुन ७४५ कोटींवर घसरण झाली होती.


गेल्या ५ दिवसात शेअर १०.९९% घसरला असून एक महिन्याच्या कालावधीत शेअर ५.०८%% घसरला आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ११.३५% घसरण झाली होती. अक्झो नोबल प्रामुख्याने केमिकल्स उद्योगात कार्यरत आहे.

Comments
Add Comment

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात घसरणच-आयटी,पीएसयु बँक, मेटल शेअर्समध्ये मात्र वाढ

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने शेअर बाजारातील चढउतार

मोठी बातमी - जीएसटी तर्कसंगतीकरण गॅसमध्येही प्रभावीपणे लागू 'इतक्या' रुपयांनी गॅस स्वस्त होणार!

मुंबई: जीएसटी तर्कसंगतीकरणाचा फायदा ग्राहकांना परावर्तित करण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. त्याचाच

उद्योग संकृतीत मानवीय बदल का खुणावतोय? २०२६ सालचे वर्कप्लेस अधिक बुद्धिमान आणि मानवकेंद्रित असेल

मुंबई: सध्या माहिती तंत्रज्ञान व समावेशन ही यशस्वी त्रिसुत्री असताना मानव संसाधनात यांचा प्रभावीपणे वापर

मिशोचा शेअर २०% उसळला शेअर का वाढतोय? मग कारण वाचा

मोहित सोमण:मिशोचा शेअर सुसाट वेगात पळत आहे. युबीएस या ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला सकारात्मक प्रतिसाद आपल्या

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती, मंत्री नितेश राणेंची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें

काँग्रेसची टीका देश प्रेमातून नाही पाकिस्तान प्रेमातून पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ