नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सर्वांचे डोळे लिलावाकडे लागले आहेत. मात्र हा आयपीएलचा लिलाव कुठे आणि कधी लाइव्ह पाहता येणार आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा...
आयपीएलचा लिलाव कधी होणार?
आयपीएलला लिलाव हा मंगळवारी म्हणजेच १६ डिसेंबरला होणार आहे.
आयपीएलला लिलाव कुठे होणार?
आयपीएलचा लिलाव बहुतांशीपणे भारतात होतो,पण यावर्षी मात्र आयपीएलचा लिलाव हा भारतात होणार नाही.यावेळी आयपीएलचा लिलाव हा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये होणार आहे.
आयपीएलचा लिलाव भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?
यावेळी आयपीएलचा लिलाव हा युएईमध्ये होणार आहे. युएई आणि भारताच्या वेळेत तफावत आहे. त्यामुळे आयपीएलचा लिलाव हा भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहे.
आयपीएलचा लिलाव कुठे लाइव्ह पाहू शकता?
आयपीएलचा लिलाव हा नेमका कुठे पाहता येणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी २० सामन्यांची मालिकाही सुरु आहे आणि लिलाव हा युएईमध्ये होणार आहे. पण यावेळी होणारा आयपीएलचा लिलाव हा स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर लाइव्ह पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला हा लिलाव मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहायचा असेल तर तुम्ही Jio Hotstar वर थेट पाहू शकता. हा लिलाव दुपारी २.३० वाजता सुरु झाला की, दिवसभर असणार आहे. कारण संपूर्ण दिवस फक्त लिलाव चालणार आहे.
आयपीएलच्या लिलावाची उत्सुकता सर्वांनाच असते. कारण या लिलावात कोणते खेळाडू कोणत्या संघात जात आहेत, हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्वाचे असते. त्यामुळे आयपीएच्या लिलावात कोणता महागडा खेळाडू ठरतो, कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो आणि कोणते खेळाडू अनसोल्ड राहतात, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. त्यामुळे आयपीएच्या लिलावावर सर्वांचे लक्ष असणार आहे.