मोहित सोमण: आज अमेरिकेत नॉनफार्म पेरोल रोजगार डेटा जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सावधतेने व्यवहार सुरु ठेवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्यातील नफा बुकिंगसह खरेदी राखल्याने युएस बाजारातील सोन्याचांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. युएस बाजारातील महागाईत मोठ्या प्रमाणात आव्हाने कायम आहेत यासाठी बाजारात तरलता (Liquidity) राखण्यासाठी गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात केली त्यानंतर व्याजदर ३.५० ते ३.७५% पातळीवर सुरू होता. पुढील पतधोरण समितीच्या बैठकीचा निर्णय आगामी रोजगार, महागाई, विक्री आकडेवारीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे बाजारातील सेल ऑफ काही प्रमाणात सुरु असताना नवी खरेदी गुंतवणूकदारांनी थांबल्याचा परिणाम म्हणून सोने व चांदी मोठ्या पातळीवर घसरले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात थेट २४ कॅरेटसाठी १५२ रूपये, २२ कॅरेटसाठी १४० रूपये, १८ कॅरेटसाठी ११५ रूपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति दर २४ कॅरेटमागे ११३८६, २२ कॅरेटमागे १२२७०, १८ कॅरेटमागे १००३९ रूपयांवर पोहोचला आहे.
माहितीनुसार, प्रति तोळा विचार केल्यास २४ कॅरेटसाठी १५२० रुपयांनी, २२ कॅरेटसाठी १४०० रूपयांनी, १८ कॅरेटसाठी ११५० रूपयांनी घसरला. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटमागे १३३८६०, २२ कॅरेटमागे १२२७००, १८ कॅरेटमागे १००३९० रूपयांवर पोहोचला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३३८६, २२ कॅरेटसाठी १२२७०, १८ कॅरेटसाठी १००३९ रूपयांवर पोहोचला आहे. संध्याकाळपर्यंत भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात ०.१९% वाढ झाली आहे. त्यामुळे दरपातळी १३४३८४ रूपयांवर व्यवहार करत आहे.
जागतिक स्तरावर सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२७% घसरण झाली असून जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.२०% घसरण झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४२९५.९५ औंसवर गेली आहे.
सकाळी स्पॉट सोन्याचे दर ०.४% नी घसरून ४२८९.३८ प्रति औंस झाले असून फेब्रुवारीसाठीच्या सोन्याच्या वायदा दरात ०.५% नी घसरण होऊन ते $४३१५.३० झाले आहेत. अमेरिकेच्या लेबर मार्केटमध्ये काही प्रमाणात आलेल्या मलगळीनंतर बाजारात कमोडिटीतील नरमाईची अधिक चिन्हे दिसतील अशी अपेक्षा तज्ञ व्यक्त करत आहेत.
विशेषतः नोव्हेंबर महिन्याच्या महत्त्वाच्या ग्राहक किंमत निर्देशांक महागाईच्या आकडेवारीच्या काही दिवस आधीच रोजगाराची आकडेवारी जाहीर झाली होती. नवी आकडेवारी गुरुवारी जाहीर होणार असून महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसतात का, यासाठी त्यावर गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवले जाईल. ही नवी आकडेवारी पुढील पतधोरणासाठी दिशादर्शक राहू शकते. त्यामुळे यावर आधारित धोरणात बदल करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेसाठी पुढील दरकपातीवर हे दोन घटक परिणाम करू शकतात.युएस बाजारात व्याजदर कमी झाल्यामुळे २०२५ मध्ये आतापर्यंत या दोन्ही धातूंनी उत्कृष्ट नफा मिळवला आहे, तर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीलाही चालना मिळत आहे.
सोन्यावर आपली प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सुरुवातीच्या व्यवहारात नफावसुली झाल्यामुळे सोन्याच्या किमती अस्थिर राहिल्या, ज्यामुळे कॉमेक्स सोन्याचा भाव ४२७५ डॉलरच्या पातळीकडे घसरला आणि दबावाखाली राहिला. तथापि, रुपयाच्या कमजोरीमुळे देशांतर्गत किमतींना आधार मिळाला, ज्यामुळे कॉमेक्समधील ०.७०% च्या तीव्र घसरणीच्या तुलनेत एमसीएक्स सोन्यामधील नुकसान सुमारे ०.४०% पर्यंत मर्यादित राहिले. बाजाराचे लक्ष आता या आठवड्याच्या उत्तरार्धात जाहीर होणाऱ्या महत्त्वाच्या अमेरिकन आर्थिक निर्देशांकांवर, विशेषतः नॉन-फार्म पेरोल्स आणि कोअर पीसीई किंमत निर्देशांकावर केंद्रित झाले आहे, जे पुढील दिशात्मक बदलाला चालना देण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात, सोने १३१००० ते १३५००० च्या अस्थिर श्रेणीत व्यवहार करण्याची शक्यता आहे.'
चांदीच्या दरातही मोठी घसरण !
श पेरोल रोजगार आकडेवारी प्रदर्शित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे चांदी आज मोठ्या संख्येने घसरली. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३.९० रूपयांनी, प्रति किलो दरात ३९०० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १९९.१० रूपयांवर, प्रति किलो दर १९९१०० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील १० ग्रॅम चांदीचे सरासरी दर १९९१ रूपये, प्रति किलो दर १९९१०० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर संध्याकाळपर्यंत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.२९% घसरण झाली आहे.
याच अस्थिरतेचा फटका चांदीलाही बसल्याने स्पॉट चांदी १.९% घसरून ६२.८५९५ डॉलरवर पोहोचली असून गेल्या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर नफावसुलीला सुरूवात झाल्याने दिसून येते. चांदीचे वायदा फ्युचर १.२% नी घसरून ६२.८३० डॉलर प्रति औंस झाले आहेत. या अस्थिरतेचा फटका इतर कमोडिटीतही बसला आहे.