मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ ची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल सुविधांचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीआशिष शेलार यांच्या शुभहस्ते सोमवारी १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.येत्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांबाबतचे समर्पक असे संकेतस्थळ आणि ओपीडी रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित सेवांमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती अधिक सुलभपणे मिळण्यासाठी मदत होणार आहे.



महानगरपालिकेच्या वतीने डिजीटल पुढाकार अंतर्गत नागरिकांना आरोग्य क्षेत्रासाठी चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजीटल पुढाकाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढवतानाच, आरोग्य सुविधांची पोहच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.


सार्वजनिक आरोग्याशी संबंधित माहिती सहजशक्य आणि डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी दिले होते. डिजीटल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे माहिती उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेच्या कामकाजात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. याचा एक भाग म्हणून डिजीटल पद्धतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासह अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल. अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही पुढाकारांमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. तसेच आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन प्रसंगीचे निर्णय घेण्यासाठी ही सुविधा महत्वाची ठरेल.



बीएमसी हेल्थ चॅटबॉट


नागरिकांना आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून ते संपूर्ण आरोग्य सेवांची माहिती देण्यासाठी 9892993368 हा चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पुढाकार अंतर्गत आजाराबाबत जनजागृती, आरोग्य क्षेत्रातील मोहीमेची माहिती, नजीकची आरोग्य सुविधा, नोंदणींबाबत माहिती, आरोग्य प्रमाणपत्र तसेच परवान्याबाबतची माहिती, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी भेटीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी इत्यादी सुविधा चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच आरोग्य यंत्रणेतील कार्यक्षमता वाढीसाठीही मदत होईल.
नागरी सेवांमध्ये जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्याबाबतची माहिती, विवाह नोंदणीची माहिती, अपंगत्व प्रमाणपत्र, आरोग्य परवाने तसेच प्रसूतिगृहाशी संबंधित परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेची माहितीही या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे.



ऑनलाईन नोंदणी आणि सेवा नोंदणी


नागरिकांना आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑनलाईन नोंद करण्यासाठी डिजिटल पद्धतीने नोंद करणे शक्य होणार आहे. नागरिकांची वेळेची बचत ऑनलाईन नोंदणी सुविधेमुळे शक्य होईल.



राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय आरोग्य सेवांसाठीचा पुढाकार


राज्य आणि राष्ट्रीय स्थरावरील आरोग्य सुविधा आणि सेवांसाठी महत्वाची माहिती चॅटबॉटच्या माध्यमातून आगामी कालावधीत उपलब्ध होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित विविध आरोग्य योजनांची माहिती याठिकाणी उपलब्ध होईल.





Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र