Stock Market Closing Bell:आज अखेरच्या सत्रात बाजार 'रिबाऊंड' मात्र घरगुती गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे सेन्सेक्स व निफ्टी किरकोळ कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. विशेषतः सकाळच्या घसरणीनंतर हा संकेत कायम असतानाही दुपारपर्यंत बाजाराने पुन्हा मोठ्या पातळीवर रिकव्हरी केल्याचे स्पष्ट दिसून आले. तांत्रिकदृष्ट्या ही घसरण कायम राहिल्याने सेन्सेक्स ५४.३० अंकाने घसरत ८५२१३.३६ व निफ्टी १९.६५ अंकाने घसरत २६०२७.३० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः आज गुंतवणूकदारांनी सततच्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुरु ठेवलेल्या विक्रीचा परिणाम म्हणून आपल्या गुंतवणूकीत सावधगिरी राखली आहे. तसेच आपल्या खरेदीत नियंत्रण आणले तरी मजबूत फंडामेंटलचा टेक्निकल अंडरकरंट कायम राहिल्याने शेअर्स अखेरच्या सत्रात समाधानकारक पातळीवर रिबाऊंड झाल्याने दिसून आले.


दुसरीकडे युएस भारत यांच्यातील नसलेल्या अपेक्षित ट्रिगरसह रूपयात झालेल्या महाविक्रमी घसरणीचा फटका मात्र निश्चितपणे बसला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही चांगल्या पद्धतीने रेपो दरातील कपातीचा परिणाम म्हणून सुधारणा झाल्याने आज किरकोळ वाढीसह हे निर्देशांक बंद झाले. याव्यतिरिक्त व्यापक निर्देशांकातील विशेष म्हणजे सकाळच्या मिडकॅप मधील जागा घसरणीने घेतली असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढलेल्या गुंतवणूकीमुळे हा निर्देशांक तेजीत कायम राहिल्याचा कयास बांधला जात आहे. यासह स्मॉलकॅप १०० (०.२१%), स्मॉलकॅप २५० (०.३६%) निर्देशांकात घसरण झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडिया (१.७९%), आयटी (०.२९%), पीएसयु बँक (०.४६%), एफएमसीजी (०.६९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो (०.९१%), फार्मा (०.३९%), हेल्थकेअर (०.२९%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५%) निर्देशांकात झाली आहे.


समाधानकारक बाब म्हणजे सकाळी ५% पेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) १.४०% पातळीवर पोहोचला. हेवी वेट शेअर्समध्ये झालेली पडझड अखेरच्या सत्रात रिबाऊंड झाल्याने बाजाराला फायदा झाला. एचडीएफसी, अँक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण झाली असून रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, डिक्सन टेक्नॉलॉजी, हिंदुस्थान युनिलिव्हर, हिंदुस्थान कॉपर यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाली. जागतिक बाजारात पाहता अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.१७%) सत्र. हेंगसेंग (१.४८%), कोसपी (०.८७%), शांघाई कंपोझिट (०.५५%) निर्देशांकात घसरण झाली असून वाढ केवळ स्ट्रेट टाईम्स (०.०६%), सेट कंपोझिट (१.५२%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.५२%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.०७%), नासडाक (१.७२%) निर्देशांकात झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ प्राज इंडस्ट्रीज (१०.०९%), टीआरआयएल (९.३१%), एथर एनर्जी (६.२२%), आरती इंडस्ट्रीज (५.४२%), एनबीसीसी (५.३१%), उषा मार्टिन (४.७४%), कजारिया सिरॅमिक (४.३०%), गोदावरी पॉवर (३.६०%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण पीटीसी इंडस्ट्रीज (३.८८%), सीसीएल प्रोडक्ट (३.५३%), बीएसई (३.१५%), आदित्य बिर्ला कॅपिटल (३.०७%), आदित्य बिर्ला फॅशन (२.८८%), न्यू इंडिया अँन्शुरन्स (२.७५%), एचडीएफसी एएमसी (२.५३%), वोडाफोन आयडिया (२.४९%), एम अँड एम (१.९५%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'परदेशी निधीचा सतत होणारी जावक (Outflow) आणि कमकुवत रुपया यामुळे बाजारपेठा मर्यादित कक्षेत राहिल्या आहेत, आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत स्पष्टता येईपर्यंत चलन अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि राजकोषीय वाढीच्या घटकांच्या पाठिंब्याने, आर्थिक वर्ष २०२६ च्या उत्तरार्धात कमाईत सुधारणा होण्याच्या अपेक्षांमुळे बाजारातील भावना स्थिर होण्यास मदत होत आहे. पुढे जाऊन, बाजाराची गती मूल्यांकनावर आधारित न राहता, कमाईवर आधारित असेल अशी अपेक्षा आहे.
गुंतवणूकदार अमेरिकेतील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई आणि बेरोजगारीच्या आकडेवारीसह महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांची देखील वाट पाहत आहेत, जे जागतिक तरलतेच्या अपेक्षा आणि २०२६ साठीच्या व्याजदर दृष्टिकोनाला आकार देतील.'

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम