मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज (१५ डिसेंबर) पत्रकार परिषद (State Election Commission Maharashtra) होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज सायंकाळी ४ वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांचा (Municipal Corporation Election २०२५) कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर आज निवडणुका जाहीर झाल्या, तर राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे सायंकाळी ४ वाजता निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतो आणि राज्यातील राजकीय वातावरण कसे बदलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे."
"राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिका, तसेच नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगाने तयारी सुरु केली असून, प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे."
कोणत्या २९ महापालिकेची निवडणूक होणार? (Municipal Corporation Election २०२५)
१.अहिल्यानगर महानगरपालिका
२.अकोला महानगरपालिका
३.अमरावती महानगरपालिका
४. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
५. बृहन्मुंबई महानगरपालिका
६. चंद्रपूर महानगरपालिका
७. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८. धुळे महानगरपालिका
९. इचलकरंजी महानगरपालिका
१०. जळगाव महानगरपालिका
११. जालना महानगरपालिका
१२. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
१३. कोल्हापूर महानगरपालिका
१४. लातूर महानगरपालिका
१५. मालेगाव महानगरपालिका
१६. मीरा भाईंदर महानगरपालिका
१७. नागपूर महानगरपालिका
१८. नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९. नाशिक महानगरपालिका
२०. नवी मुंबई महानगरपालिका
२१. पनवेल महानगरपालिका
२२. परभणी महानगरपालिका
२३. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२४. पुणे महानगरपालिका
२५. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
२६. सोलापूर महानगरपालिका
२७. ठाणे महानगरपालिका
२८. उल्हासनगर महानगरपालिका
२९. वसई विरार महानगरपालिका






