घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर

नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू), तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध होती. या योजनेसाठी घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज मागे घेतली. तर काहींनी घराची लॉटरी लागल्यावरही रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर आता सिडकोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोने घरांच्या किंमतींमध्ये दहा टक्के घट केली असून पून्हा संधी दिली आहे. तसेच लॉटरी विज्येत्यांपैकी घर रद्द केलेल्यांनाही एक संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


सिडकोने जाहीर केलेल्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेमध्ये अगदी २५ लाखांपासून ते ९७ लाखांपर्यंत घरं उपलब्ध होती. या घरांच्या किंमती आता १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हणजेच २५ लाखाचे असलेले घर आता अडीच लाखांनी कमी होणार आहे. म्हणजेच हे घर आता २२ लाख ५० हजारांना मिळणार आहे. शिवाय जर हे घर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गमध्ये असेल तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अडीज लाखांची सबसीडीदेखील मिळणार आहे. ज्यामुळे हे घर २० लाखात मिळणार आहे. सिडकोच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.




आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कळंबोली बस डेपो येथे विक्रीस असलेली घर सर्वात महाग होती. ज्याची किंमत साधारणत: ४२ लाखांच्या घरात होती. पण आता १० टक्के किंमत कमी झाल्यानंतर हेच घर आता ३६ लाखात मिळणार आहे. शिवाय यावर अडीच लाखांची सबसीडी लागू झाल्यानंतर त्याची किंमत ३४ लाखांपर्यंत झाली आहे. त्यामुळे या वर्गातील लॉटरी धारकांना त्याचामोठा दिलासा मिळणार आहे. तर खारघर बस डेपो मध्ये याच वर्गातील घरांची किंमत ४८ लाखांपर्यंत होती. हे घर ही नव्या किंमतीनुसार जवळपास ४३ ते ४४ लाखापर्यंत मिळणार आहे. इथेसुद्धा अडीच लाखांची सबसीडी लागू होणार आहे.


सिडकोने १० टक्के दर कमी केल्यामुळे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घर खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अडीज लाखांच्या अनुदानासोबतच १० टक्के स्वस्त किंमतींचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, या योजनेच्या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदती दरम्यान संबंधित अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.


Comments
Add Comment

कांदिवली पश्चिमेला बस प्रवाशांची तारेवरची कसरत

कांदिवली : कांदिवली पश्चिमेला एस. व्ही. रोड आणि चारकोप येथील सह्याद्री नगर समोरील मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण

मेट्रो-१ मार्गिकेच्या १२ स्थानकांवर आता सॅनिटरी पॅड देणारे यंत्र

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकतील सर्व बारा मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

पीएचडीची नोंदणी रद्द केलेले ५५३ विद्यार्थी आक्रमक

मुंबई विद्यापीठाकडून अपयश लपविण्यासाठी विद्यार्थ्यांवर खापर मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी करणाऱ्या तब्बल

कांदिवली–बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेचा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाच्या कामाशी संबंधित काम करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित

मुंबई :भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने आपल्या सागरी संचालनाच्या

घरभाडे थकवल्यास विकासकांवर कठोर कारवाई

झोपु प्राधिकरणाकडून विक्री घटकातील घरे होणार जप्त मुंबई : मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणारे अनेक