गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पती अनंत गर्जेला पुन्हा एसआयटीकडून अटक

मुंबई : भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पती अनंत गर्जे याला विशेष तपास पथकाने पुन्हा अटक केली आहे.


काही दिवसांपूर्वी गौरी गर्जे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. उच्चशिक्षित महिला आणि राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तीची पत्नी असल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती.


गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एसआयटीकडून थेट कारवाई करत अनंत गर्जे याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.


 



 

अनंत गर्जे याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नव्या अटकेमुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर काही तासांतच वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. त्यानंतर तो आधी पोलीस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. वरळी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. अशातच एसआयटीकडून झालेली दुसरी अटक या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी ठरली आहे. आता एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

भास्कर जाधव एकटे असल्यावर वेगळे बोलतात, आदित्य ठाकरे असल्यावर वेगळ्या टोनमध्ये बोलतात!

मंत्री नितेश राणेंची टोलेबाजी; मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच बैठक घेणार नागपूर : हिवाळी

भगवान पतंजली

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी  योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत् तं प्रवरं

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती

नागपूर : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के

हजारो शिक्षकांना दिलासा! शाळा बंद पडणार नाहीत, पटसंख्येची अट होणार शिथील

मुंबई: कमी पटसंख्या असल्याचं कारण देत राज्यभरातील ७०० मराठी शाळा बंद पडण्याची आणि २५ हजारांपेक्षा अधिक

मराठवाड्यातील मतदारांना रंगतदार निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा

डॉ . अभयकुमार दांडगे abhaydandage@gmail.com मराठवाड्यातील एकूण ४६ नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात