Sunday, December 14, 2025

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

गुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी केल्याच्या आणि भारतीय हवाई दलाची गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली आसाम पोलिसांनी हवाई दलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर परिसरात राहणाऱ्या कुलेंद्र सरमा या निवृत्त अधिकाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून आसाम पोलिसांची गुप्त नजर होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सरमा हा सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून पाकिस्तानस्थित व्यक्तींच्या संपर्कात होता, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सरमाने काही संवेदनशील कागदपत्रे आणि संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचवल्याचे उघड झाले आहे.

पुरावे आणि पुढील तपास

शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी सरमाच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या उपकरणांमधील काही डेटा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही कारवाई सुरू असतानाच, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधून आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच संशयित हेर पकडले गेले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी किती लोक सामील आहेत.

Comments
Add Comment