या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे.
मुंबई : 'गुगल ईयर इन सर्च २०२५ 'अहवालाने जगभरातील इंटरनेट विश्वात मोठी चर्चा घडवून आणली आहे. या अहवालानुसार, रात्री १० वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंतच्या वेळेत महिलांनी विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील मुलींनी केलेल्या सर्च डेटा समोर आला आहे. रात्रीच्या या वेळात महिलांच्या सर्चची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. महिलांच्या सर्च करण्याच्या गोष्टी पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही.
रात्रीच्या वेळेतील टॉप ट्रेंड्स
१) AI बॉयफ्रेंड चॅट : AI च्या जगात आता आपण AI वर काहीही सर्च करू शकतो परंतु , एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मुली मोठ्या प्रमाणात AI चा वापर करत आहेत . यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की २५ टक्के मुली या खऱ्या संबंधांपेक्षा AI चॅटला प्राधान्य देत असल्याचे आढळले आहे. ही गोष्ट सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. शिवाय ती तेवढीच धक्कादायक ही समजली जाते.
२ ) झोप न येण्यावर घरगुती उपाय : 'इन्सोम्निया' अर्थात निद्रानाशावर नैसर्गिक उपाय शोधण्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. ताणामुळे झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक मुली घरगुती उपचार शोधत आहेत. परिणामी फार्मसी डिलिव्हरीच्या ऑर्डर्स दुप्पट झाल्या आहेत. बऱ्याच्या मुली शांत झोप कशामुळे येते या गोष्टी गुगलवर सर्च करत असताना दिसल्या आहेत.
३) स्किनकेअर रूटीन : गुगल सर्चमध्ये ब्युटी ट्रेंडमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी 'मॅजिक ॲसिड' किंवा विशिष्ट उत्पादनं सर्च केली जात आहेत. त्वचेची काळजी कशी घेतली जावी. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. त्याचे उपाय काय आहेत. त्यासाठी कोणती प्रॉडक्ट वापरणे गरजेचे आहे या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे.
इतर गुगल सर्च
याशिवाय, नाश्ता रेसिपीज, फॅशन हॅक्स, ज्योतिष, मेंटल हेल्थ चेक-अप आणि व्हायरल मिम्स हे विषयही रात्रीच्या सर्चमध्ये आघाडीवर राहिले. जोतिष पाहाणाऱ्या मुलींची ही संख्या त्यात जास्त आहे. हा अहवाल महिलांच्या बदललेल्या जीवनशैली आणि मानसिक आरोग्याच्या गरजांवर प्रकाश टाकतो असं म्हणायला काही हरकत नाही.