Stock Market Outlook: या आठवड्यात बाजारात कल 'नियंत्रित' तेजीकडे!स्टॉक मार्केटमध्ये काय घडले व पुढील स्ट्रॅटेजी काय? वाचा

मोहित सोमण: एकूणच आठवड्यातील परिस्थिती पाहता शेअर बाजारात रॅली पुढील आठवड्यात राहण्याचे संकेत मिळत आहेत. या आठवड्यात एकूण तीन दिवस घसरण व दोन दिवस वाढ झाली असली तरीसुद्धा बाजारात तेजीचा अंडरकरंट कायम आहे. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे देशातील वाढलेली जीडीपी वाढ, घसरलेल्या जीएसटीमुळे बाजारात वाढलेली उलाढाल, पुनः यंदा २५ बेसिसने केलेली रेपो दरात कपात, व नुकतीच झालेली युएसमधील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपात या कारणामुळे शेअर बाजारातील वाढ झाली असल्याने पुढील आठवड्यातही हे ट्रिगर कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. खरं म्हणजे घसरलेला रूपया, वाढती परदेशी गुंतवणूकीची विक्री, किरकोळ महागाईत झालेली किरकोळ वाढ, चलनसाठ्यातील मर्यादित वाढ, चलनवाढ आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे भारतीय कंपनीच्या फंडामेटलमध्ये सुधारणा झाली असली तरी मार्जिनमधील अपेक्षित वाढ, वाढती स्पर्धा, भौगोलिक भूराजकीय अस्थिरता या समस्याही निश्चितच आहेत.


गेल्या संपूर्ण आठवड्यात बाजारात अस्थिरता मोठ्या प्रमाणात असल्याने प्राईज करेक्शन झाले होते. मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग (Profit Booking) झाल्याने कंसोलिडेशन सध्या तरी संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी फेड दर कपातीचा ट्रिगर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान चीनमधील समाधानकारक नसलेली रोजगार, महागाई आकडेवारी हा देखील चर्चेचा विषय असून आगामी रशिया युक्रेन यांच्यातील वादावरूश कमोडिटी, रुपया,सोने,चांदी यांच्या किंमतीतील हालचाल अवलंबून असेल. इतकेच नाही तर सरकारकडून मोठ्या प्रमाणात टेक्साटाईलह इतर उत्पादनात पीएलआय योजनेला बळ दिले गेल्याने उत्पादन क्षमतेत वाढ होईल असे म्हटले जात आहे. आरबीआयच्या निकालात आरबीआयने एक लाख कोटींचे बाँड खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले होते जेणेकरून मोठ्या प्रमाणात बाजारात तरलता (Liquidity) निर्माण होऊ शकते. अर्थात सरकारला महागाई नियंत्रण व जीडीपी वाढ दोन्ही बाजूंनी विचार करावा लागू शकतो. युएससह अद्याप बोलणी स्पष्टपणे न झाल्याने बाजारात अद्याप विशेषतः निर्यातदारांमध्ये अस्थिरता कायम आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावरही कायम राहू शकतो.


याविषयी बोलताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणतात,'अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वीची सावधगिरी, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (FII) सततचा निधीची विक्री, रुपयाची सततची कमजोरी आणि अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींसंदर्भातील अनिश्चितता यामुळे भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात संथ गतीने केली आणि निर्देशांक २६००० च्या खाली घसरला. वाढत्या जपानी बाँड उत्पन्नामुळे आणि डिसेंबरमध्ये बँक ऑफ जपानकडून व्याजदर वाढीच्या अपेक्षांमुळे जागतिक जोखीम टाळण्याची भावना आणखी वाढली. क्षेत्रीय कामगिरी संमिश्र होती, ज्यात माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्र दबावाखाली होते, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थावर मालमत्ता आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंच्या क्षेत्रात निवडक खरेदी दिसून आली.


आठवड्याच्या उत्तरार्धात फेडरल रिझर्व्हने २५ बेसिस पॉइंट्सची व्याजदर कपात जाहीर केल्यानंतर बाजारातील भावनांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे तरलतेची चिंता कमी झाली आणि नवीन FII गुंतवणुकीच्या आशा पल्लवित झाल्या. मध्यवर्ती बँकेच्या सहायक धोरणांमुळे, स्थिर देशांतर्गत गुंतवणुकीमुळे आणि अस्पष्ट वेळापत्रक असूनही व्यापार प्रगतीबद्दलच्या आशावादामुळे, प्रमुख निर्देशांकांनी आठवड्याचा शेवट मजबूत स्थितीत केला.


पुढच्या काळात, बाजार सकारात्मक कल कायम ठेवण्याची शक्यता आहे, परंतु रुपयाची स्थिरता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) गुंतवणुकीचे प्रवाह आणि व्यापार करारांवरील स्पष्टता, तसेच बँक ऑफ जपान, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडकडून मिळणाऱ्या जागतिक संकेतांप्रति संवेदनशील राहतील. भारताचा नोव्हेंबर महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जो आज नंतर जाहीर होणार आहे, तो रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक मर्यादेत राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे धोरणात्मक स्थिरतेला बळकटी मिळेल, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा (DII) मजबूत निधीचा ओघ बाजारातील अस्थिरतेला आधार देत आहे. चलनातील चढउतार आणि जागतिक व्यापार अनिश्चिततेमुळे धोके कायम आहेत तथापि, सुधारणारी कमाईची दृश्यमानता आणि तरलतेचा आधार एक एक सकारात्मक पार्श्वभूमी प्रदान करतात आणि बाजाराला घसरणीपासून संरक्षण देतात.


गेल्या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स ०.१७% घसरला असून निफ्टी ५० हा ०.३६% घसरला आहे. मात्र संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास सेन्सेक्स ०.९३% व निफ्टी ०.६५% वाढला आहे. तर केवळ नोव्हेंबरचा विचार केल्यास निफ्टी १.८७% व निफ्टी मिडकॅप १५० हा १.५९% उसळला होता.


याचविषयी बोलताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस आपल्या म्युच्युअल फंडच्या ग्लोबल मार्केट स्नॅपशॉट अहवालात म्हणते, निफ्टी ५० आणि निफ्टी मिडकॅप १५० हे अनुक्रमे नोव्हेंबर महिन्यात १.८७% आणि १.५९% वाढीसह सर्वोत्तम कामगिरी करणारे निर्देशांक म्हणून उदयास आले आहेत.


निफ्टी मिडकॅप १५० ने गेल्या ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे ७.९३%, ६.०१% आणि ७.१२% वाढीसह सातत्यपूर्ण कामगिरी दर्शविली. त्या तुलनेत, निफ्टी ५० ने याच ३ महिन्यांच्या, ६ महिन्यांच्या आणि १ वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे ७.२७%, ५.८७% आणि ८.५९% परतावा देऊन सरस कामगिरी केली आहे. तसेच फंड मॅनेजर हाऊसने म्हंटले आहे की, 'विस्तृत बाजारानेही चांगली वाढ नोंदवली, नोव्हेंबर २०२५ मध्ये निफ्टी ५०० मध्ये ०.९४% वाढ झाली, ज्यात लार्ज आणि मिडकॅपमध्ये सुमारे १-२% वाढ झाली आणि स्मॉलकॅपमध्ये सुमारे १-३% घसरण झाली. गेल्या ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षाच्या कालावधीत या निर्देशांकाने सलग ६.५५%, ४.९६% आणि ५.९४% सकारात्मक परतावा दिला आहे. निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकाने संमिश्र गती दर्शविली, महिन्यात ३.३६% घसरण झाली, तर गेल्या ३ महिन्यांत १.३७% ची माफक वाढ नोंदवली. तथापि दीर्घ कालावधीत परतावा (Return) मंद राहिला, ६ महिन्यांत ०.६०% आणि १ वर्षाच्या कालावधीत ५.५५% ची घसरण झाली.'


'निफ्टी मायक्रोकॅप २५० निर्देशांकातही अस्थिरता दिसून आली, नोव्हेंबरमध्ये २.८३% घसरण नोंदवली गेली. ३ महिन्यांच्या कालावधीत, निर्देशांकाने ०.५१% परतावा दिला आणि ६-महिन्यांच्या आणि १-वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे -१.५८% आणि -७.९७% ची घसरण झाली, ज्यामुळे मायक्रोकॅप विभागात सततचा दबाव अधोरेखित होतो. निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांक महिन्याच्या अखेरीस ०.९८% च्या किरकोळ घसरणीसह बंद झाला, परंतु मध्यम मुदतीत त्याने सकारात्मक गती कायम ठेवली, ३ महिन्यांत ५.१६% आणि ६ महिन्यांत ३.५६% ची वाढ नोंदवली, तर १ वर्षाच्या कालावधीत -२.२५% परतावा दिला' असेही अहवालात म्हटले आहे.


संपूर्ण आठवड्याचा विचार केल्यास निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वाधिक चांगली कामगिरी एनर्जी (०.१९%), मेटल (१.९०%) निर्देशांकाने केली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात घसरण पीएसयु बँक (१.६०%), एफएमसीजी (१.२९%), रिअल्टी (०.७४%) निर्देशांकात झाली आहे. बारकाईने पाहिल्यास भूराजकीय अस्थिरतेच्या काळातही धोरणात्मक निर्णयांमुळे मेटल शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला असून सर्वाधिक अस्थिरतेचा फटका एफएमसीजी, पीएसयु बँक, बँक, रिअल्टी शेअर्समध्ये झाला आहे असे असताना भारतीय निर्देशांकात चढउतार कायम असली तरी फंडामेंटल सक्षम राहिले आहे. याविषयी बोलताना,'नोव्हेंबरमध्ये आयटी क्षेत्राने ४.७४%, ऑटो क्षेत्राने ३.६०%, बँकांनी ३.४२% आणि आरोग्यसेवा क्षेत्राने २.३०% वाढ नोंदवल्याने क्षेत्रांची कामगिरी संमिश्र राहिल्याचे म्हटले.


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील फोन कॉल ही एक महत्वाची घटना नुकतीच घडली त्यामुळे गुंतवणूकदारांना नवी आश्वासकता दिसते.दोन्ही नेत्यांनी व्यापार, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली होती या घटनेमुळे बाजाराला चालना मिळाली आहे. यासह भारताने रशियाशी मोठ्या प्रमाणात संरक्षण करार करण्याचे ठरवल्यानेही संरक्षण क्षेत्राने १९.४३% च्या प्रभावी परताव्यासह सर्वात चमकदार वार्षिक कामगिरी केली आहे. आणि वर्षाभरातील सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग म्हणून उदयास आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरकपातीचा निर्णय, तसेच आरबीआयच्या रेपो दरात कपात यामुळे संवेदनशील निर्देशांकानेही चांगली कामगिरी केली.ऑटो क्षेत्राने १८.८५%, बँकिंग क्षेत्रानेही १४.७९% ची चांगली वाढ नोंदवली आणि धातू क्षेत्रानेही १३.९४% ची मजबूत वाढ नोंदवली असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानुसार,आरोग्यसेवा क्षेत्राने ६.४०% वाढ नोंदवली जी स्थिर परंतु नियंत्रित विस्ताराचे संकेत देते असेही अहवालाने स्पष्ट केले.


दुसरीकडे, रिअल्टी क्षेत्रात नोव्हेंबरमध्ये ४.६९% आणि गेल्या वर्षभरात ११.४७% ची आणखी घसरण झाली. व्यापक कल पाहता नोव्हेंबरमध्ये या क्षेत्रांमध्ये १-४% ची घट दिसून येते, जी क्षेत्र-विशिष्ट समभागातील (Stocks) मधील दबावासह पूर्वीच्या तेजीनंतर नफावसुली दर्शवते असेही अहवालाने म्हटले आहे. एकूणच सध्याची बाजाराची स्थिती सकारात्मक आहे असे दिसते.


भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा आठवड्याची सुरुवात नकारात्मकतेने केली असून सोमवारच्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. २०२५ मध्ये शेवटच्या तिमाहीतील कामगिरीचे विश्लेषण केले तर निफ्टी जवळपास ५% वाढला आहे. जागतिक बाजारातील कामगिरीशी बऱ्याच पातळीवर समान दिसतो. निश्चितच अस्थिरता असल्याने विशेष क्षेत्रीय शेअर्समध्ये त्याचा परिणाम जाणवतो ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना अपेक्षित फायदा झाला नाही अशीही स्थिती बाजारात दिसते.


परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली या आठवड्यात १.५५५ लाख कोटी रुपयांची आहे. यावर मोतीलाल ओसवाल म्हणते, 'यावेळी आम्ही पाहिले की रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदार जे सामान्यतः व्यापक बाजारात गुंतवणूक करतात ते देखील निव्वळ विक्रेते ठरले आहेत. आकडेवारीनुसार, या गुंतवणूदारांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी १३७७६ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. नोव्हेंबरमध्ये ही त्यांनी जवळपास १२१८० कोटी रुपयांची विक्री केली. म्हणूनच मोतीलाल ओसवालने सततच्या विक्रीचा व्यापक बाजाराच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला असल्याचेही यात स्पष्ट केले.


पुढे मोतीलाल ओसवालने म्हटले की,'आमचे मत आहे की जोपर्यंत व्यवसाय नफा मिळवत राहील तोपर्यंत शेअरच्या किमतीही वाढतीलच त्यामुळे जर गुंतवणूकदारांकडे रोख रक्कम असेल तर अशा टप्प्यांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. सध्या गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. गेल्या एका वर्षात परदेशी संस्थांनी पैसे काढून घेणे आणि शुल्कासंबंधीची वाढलेली चिंता लक्षात घेता यामुळे स्थिर जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजाराला चढउतारांचा सामना करावा लागला, परंतु आता धोरणात्मक उपाययोजना, जीएसटी कपात आणि सुधारलेल्या कमाईच्या दृष्टिकोनामुळे बाजाराने पुन्हा बळ मिळवले आहे. त्यामुळे काही अडथळे येत असले तरी आम्ही भारतीय इक्विटीबद्दल सकारात्मक आहोत.' असे म्हटले.


दरम्यान दरकपातीचा दबाव नष्ट झाल्याने व डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात डॉलरची मागणी वाढली. प्रति डॉलर दरपातळी रूपयाने ९०.४२ गाठली त्याचा फटका बाजारात बसला. कच्च्या तेलाचेही दर सरासरी प्रति डॉलर ६१.२५ डॉलर प्रति बॅरेल राहिले आहेत. येणाऱ्या आठवड्यात अस्थिरतेच्या मुद्यावरुन कमोडिटी, क्रिप्टोग्राफी, सोने, चांदी यांच्यातील हालचाली बाजारातील परदेशी आवकीवर (Inflow) परिणाम करतील असे दिसते. तथापि खरेदीत सावधगिरी बाळगतानाच शिस्तबद्ध गुंतवणूक कायम राखणे हे बाजारातील गुंतवणूकदारांना महत्वाचे ठरू शकते असे आकडेवारीतून दिसते.

Comments
Add Comment

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल

मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा

एसबीआयचे ग्राहक आहात? मग खुषखबर! आता कर्जाचा हप्ता स्वस्त होणार, एसबीआयकडून 'हे' सुधारित व्याजदर जाहीर

मोहित सोमण: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने नुकतीच ग्राहकांना खुशखबर दिली आहे.

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या

लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण