लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक


नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.


तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार