यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले


यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित कलावंताने आधी घेतलेले प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. मान्यताप्राप्त संस्थेतील गुरूंकडे अधिक प्रगत प्रशिक्षणाची सुविधा असते. शिष्यवृत्तीच्या कालावधीत कलावंतास खडतर प्रशिक्षण घ्यावे लागेल. सैद्धांतिक ज्ञानप्राप्तीसाठी वेळ दिल्यानंतर या कलाकारास दररोज किमान तीन तास सराव करणे बंधनकारक आहे.


अर्हता -


संबंधित कलावंताने आपल्या कला क्षेत्रातील गुरूंकडे किंवा संस्थेकडे किमान पाच वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले असावे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना संबंधित गुरू किंवा संस्थेचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. ही शिष्यवृत्ती प्रगत प्रशिक्षणासाठी असल्याने संबंधित कलावंताने आपल्या कलेत किमान प्रभुत्व मिळवलेले असावे. ही शिष्यवृत्ती नवशिक्या कलाकारांसाठी नाही. खडतर प्रगत प्रशिक्षणासाठी आपण तयार असल्याचा पुरावा संबंधित कलाकारास द्यावा लागेल. संबंधित कलाकाराचे वय १ एप्रिल रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.


मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत (छायाचित्रासह) पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.


१. शैक्षणिक पात्रतेची (पदवी, पदविका, डिप्लोमा इत्यादी) व अनुभवाची स्वसाक्षांकित प्रत. मूळ कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत जोडू नयेत.


२. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (मॅट्रिक्युलेशन) किंवा त्यास समकक्ष वयाचा पुरावा (ज्योतिषशास्त्रीय पत्रिका वगळून) याची एक स्वसाक्षांकित प्रत.


३. एक पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र.


४. चित्रकला, शिल्पकला किंवा अनुप्रयुक्त कला (Applied Arts) क्षेत्रातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कलाकृतींच्या छायाचित्रांच्या स्वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात.दृश्यकलेसाठी किमान शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स किंवा समकक्ष असावी.


५. जर उमेदवार एकापेक्षा अधिक क्षेत्रांसाठी अर्ज करू इच्छित असेल, तर प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा.


निवड प्रकिया


या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्ज्ञापुढे आपली कला सादर करावी लागेल किंवा मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा कला सादरीकरणाची वेळ तारीख आणि ठिकाण उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाते. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाते. निवड यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कळवलेही जाते.
संपर्क - सेंटर फॉर कल्चरल रिर्सोसेस ॲण्ड ट्रेनिंग, १५ ए, सेक्टर ७, व्दारका, नवी दिल्ली-११००७५, दूरध्वनी- ०११-२५०७४२५६, संकेतस्थळ - https://indiaculture.gov.in/ award- scholarships- young - artists- different- cultural- fields


फेलोशीप


भारत सरकारच्या सेंटर फॅार कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग या संस्थेमार्फत नृत्य, संगीत नाटक, जादू, कठपुतळी, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, कोरीव काम, कुंभार काम, भित्तीचित्रकला, सर्जनशील लेखन आदी सांस्कृतिक बाबींच्या प्रगत संशोधनासाठी दरवर्षी दिल्या जातात. या फेलोशीप दोन प्रकारच्या आहेत. दोन्ही फेलोशीपची संख्या प्रत्येकी २०० आहे.


(१) ज्युनियर फेलोशीप - या अंतर्गत दरमहा १० हजार रुपयांची फेलोशीप दिली जाते. उमेदवाराचे वय २० ते ४० या दरम्यान असावे. (या उमेदवारांचा जन्म १ एप्रिल १९९३ ते ३१ मार्च २०००च्या दरम्यान झालेला असावा.)


(२) सीनिअर फेलोशीप - ही प्रगत सांस्कृतिक संशोधनासाठी दिली जाणारी फेलोशीप आहे. ही फेलोशीप शिष्यवृत्ती नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, भित्तीचित्रकला, सर्जनशील लेखन, जादू, कठपुतळी इत्यादी क्षेत्रांतील अनुभवी कलाकार व संशोधकांसाठी दिली जाते. अर्जदाराचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक असावे (उदा. २०२५-२६ साठी १ एप्रिल १९८३ पूर्वी जन्म झाला असावा.), संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचे प्रशिक्षण गुरु/संस्थेकडून घेतलेले असावे. या फेलोशिप अंतर्गत दोन वर्षासाठी दरमहा २० हजार रुपये अर्थसाहाय्य दिलं जातं.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ आहे. संपर्क- https://ccrtindia.gov.in/


(उत्तरार्ध)

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत