राज्यातील ६० ठिकाणी ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' उभारणार! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर : विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ' संस्कार ' शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचं झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, त्या शहरात ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपये खर्च करून हे ट्राफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण फुल झाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले 'प्रबोधन, माहिती व विरंगुळयाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


विविध वाहतूक चिन्हे, प्रतिके, वेगमर्यादा पालन करण्याच्या सूचना, सुभाषितांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पालन करण्यासंबंधिचे प्रबोधन करणे, हा याचा मुख्य हेतू आहे . तथापि, या पार्कमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आकर्षक फुलझाडे व लँडस्केपिंग च्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केली जाईल.


सध्या मोटार परिवहन विभागाकडे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये हे ' ट्राफिक पार्क ' उभारले जाणार आहेत. जिथे मोटार परिवहन विभागाची जागा नसेल तिथे महापालिका, नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून अशी जागा विकसित करण्यात येणार आहे. ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफीक पार्क ' निर्मितीचा सर्व खर्च रस्ता सुरक्षा निधीच्या माध्यमातून मोटार परिवहन विभाग करणार आहे. तथापि भविष्यात त्याची देखभाल संबंधित महापालिका अथवा नगरपालिकेने करणे अपेक्षित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ठाणे व मिरा - भाईंदर येथे अशा पद्धतीचे ट्राफिक पार्क यापूर्वी निर्माण केले आहेत. त्याला विद्यार्थी त्यांचे पालक व ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (अभिजीत भोसले) जनसंपर्क अधिकारी मा. मंत्री परिवहन

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास