शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित नाही; सीबीएसई अभ्यासक्रमात बदल घडवण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले: राज्यमंत्री पंकज भोईर

अभ्यासक्रमात लवकरच 'Rise of Maratha' हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार


नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांवरील CBSE अभ्यासक्रमातील माहिती अपुरी असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला आज विधान परिषदेतील विशेष बैठकीत राज्यमंत्री पंकज भोईर यांनी सडेतोड उत्तर दिले. महाराजांचे आदर्श प्रशासकीय मॉडेल हेच सरकारच्या कारभाराचा आधार असल्याचे स्पष्ट करत, अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.



प्रशासकीय मॉडेलवर आधारित शासन


आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री भोईर यांनी स्पष्ट केले की, शिवाजी महाराजांनी उभे केलेले आदर्श मॉडेल आजही सरकार चालवत आहे आणि महाराजांच्या नावाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित आहेत. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॉडेलवर हे सरकार चालले आहे आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसला आहे," असे ठाम मत त्यांनी मांडले.



अभ्यासक्रमात होणार महत्त्वाचे बदल


अभ्यासक्रमातील अपुऱ्या माहितीवर बोलताना, मंत्री भोईर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात लवकरच २२ पानांचा सविस्तर धडा समाविष्ट करण्यात येत आहे. CBSE चा अभ्यासक्रम NCERT तयार करते. मात्र, SCERT पुणे यांच्याकडून NCERT ला अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे आणि सरकार त्याचा गांभीर्याने पाठपुरावा करत आहे. अभ्यासक्रमात लवकरच 'Rise of Maratha' (मराठा साम्राज्याचा उदय) हा महत्त्वाचा धडा जोडला जाणार आहे. NCERT मध्ये महाराष्ट्रातील सदस्य आहेत, त्यांच्याही निदर्शनास अभ्यासक्रमातील त्रुटी आणून दिल्या जातील. शिवचरित्र वाचन शाळांमध्ये नियमित होईल का आणि त्यासाठी काही विशेष उपक्रम राबवता येतील का, या दिशेनेही सरकार विचार करत आहे.



शिस्तबद्ध कारभाराचा पुरावा


आमदार तांबे यांनी अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला नसल्याचा आणि नाशिकला हायस्पीड रेल्वेने जोडण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. यावर मंत्री भोईर यांनी महाराजांची शिकवण 'राज्य प्रगतीसाठी वापरावे' हीच सरकारची प्रेरणा असल्याचे सांगितले. तसेच आमदार निवासावरून (मनोरा) झालेल्या शाब्दिक चकमकीत त्यांनी, "जर आधीच्या सरकारने योग्य बांधकाम केले असते, तर मनोरा आमदार निवासस्थान चांगले राहिले असते," असे सांगत विरोधकांच्या पूर्वीच्या कारभारावर बोट ठेवले.



युट्यूबवरील आक्षेपार्ह सामग्रीवर कठोर कारवाई


यावेळी मंत्री भोईर यांनी संभाजी महाराजांबद्दल युट्यूबवर उपलब्ध असलेल्या आक्षेपार्ह नाटकांच्या गंभीर विषयाची दखल घेतली. "संभाजी महाराजांबद्दल हे आक्षेपार्ह नाटक युट्यूबवर आहेत. त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.



सत्यजीत तांबेंना दिल्ली भेटीचे आमंत्रण


चर्चेच्या समारोपादरम्यान, राज्यमंत्री पंकज भोईर यांनी विधायक दृष्टिकोन दाखवत आमदार तांबे यांना सोबत काम करण्याचे आवाहन केले. "आपण शिष्टमंडळ करा, आपण जाऊ. येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला एकत्र काम करणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.
आणि विशेषत: तांबे यांना उद्देशून ते म्हणाले, "येणाऱ्या काळात तुमची वेळ घेऊन जबरदस्ती दिल्लीला घेऊन जाऊ आणि अभ्यासक्रमात कसे बदल करता येईल यासाठी प्रयत्न करू." तसेच, "आपण एका घरात राहिलो आहोत, येणाऱ्या काळातही आपण एका घरात राहू ही खात्री आहे," या त्यांच्या सूचक विधानामुळे सभागृहात वेगळी चर्चा रंगली.


एकंदरीत, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या योगदानाला केंद्रीय अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे चित्र मंत्री पंकज भोईर यांनी उभे केले.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या